Horoscope Today 18 December 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 18 डिसेंबर 2025, आजचा वार गुरूवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आज मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरूवार असल्याने आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज कोणत्याही घटनेचे विश्लेषण आणि शोधकार्य तुम्हाला सहज जमून जाईल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज शत्रूंचे तुमच्यापुढे काही चालणार नाही, बौद्धिक क्षेत्रामध्ये चमकत राहाल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज समाजात मान चांगला मिळेल, अनेक कामे सहजगत्या होतील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज प्रकृती स्वास्थ्य चांगले राहील, त्यामुळे तुमचा स्वभावही शांतता प्रिय आणि सुख लाभून घेणार आहोत
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज कौटुंबिक सौख्य उत्तम राहील, वैवाहिक जीवनात शुभ संबंधित घडामोडी घडतील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज क्षमाशील आणि उदार वृत्तीमुळे नवीन मित्रमंडळी भेटतील सर्व क्षेत्रात यश मिळेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज भविष्यकाळाचा विचार जरा जास्तच कराल, ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे, त्यांना फायदा होईल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज हक्काने मिळणाऱ्या मालमत्ते संबधित अडचणी दूर होतील जोडीदारासाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज घरामध्ये अचानक एखादी दुरुस्ती निघून पैशाचा अपव्यय होईल, घरामध्ये महिलांचा मूड उत्तम असेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज व्यवसायात एकंदरीत काम मनाप्रमाणे राहिल्यामुळे तुमच्या इच्छा आकांक्षा पल्लवीत होतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठीचा हा दिवस तुम्हाला खूप समाधान आनंद देऊन जाईल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज हातून होणारे कार्य अतिशय चांगले निर्माण होईल, महिला नसती कामे उकरून काढतील.
हेही वाचा
Panchgrahi Yog 2026: कर्क, तूळ, धनु, मकर, वृषभसह 7 राशींना श्रीमंतीचे संकेत! 2026 चा पॉवरफुल पंचग्रही योग करणार दुप्पट प्रगती, तुमची रास?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)