Continues below advertisement

मुंबई : धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनाला काही दिवस झाले असले, तरीही 89 वर्षांच्या या महान अभिनेत्याच्या जाण्याने अद्यापही अनेकजण दुःखात बुडालेले आहेत. धर्मेंद्र यांच्या मागे दोन पत्नी, प्रकाश कौर आणि हेमा मालिनी तसेच सहा मुलांचा मोठा परिवार आहे. सनी देओल आणि बॉबी देओल हे दोघेही बॉलीवूडमधील प्रसिद्ध चेहरे आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त धर्मेंद्र आणखी एका अभिनेत्याला त्यांचा मुलगा मानायचे.

सनी-बॉबी नाहीत, मग धर्मेंद्र यांचा खरा मुलगा कोण?

दिवंगत धर्मेंद्र यांनी अनेक वेळा जाहीरपणे सांगितले होते की ते बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान यांना आपला तिसरा मुलगा मानतात. ‘यमला पगला दीवाना’च्या ट्रेलर लाँचदरम्यान धर्मेंद्र यांनी सलमानबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करत म्हटलं होतं, “मी तर म्हणेन, हा माझा मुलगाच आहे. माझे तीन मुलगे आहेत. तिघेही खुद्दार आणि जबरदस्त आहेत. पण हा थोडा माझ्यावर जास्त गेला आहे… कारण हा रंगीला मिजाजाचा आहे.”

Continues below advertisement

सलमानवर धर्मेंद्रचे प्रेम (Dharmendra–Salman Bond)

धर्मेंद्र अनेक कार्यक्रमांमध्ये, शोमध्ये सलमान खानवर अक्षरशः प्रेमाचा वर्षाव करताना दिसत. ‘बिग बॉस’च्या मंचावरही ते अनेक वेळा पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते.

सलमानची वडिलधाऱ्यांप्रती भावना (Salman’s Respect)

फक्त धर्मेंद्रच नव्हे, तर सलमान खानदेखील त्यांना पिता समान आदर देत असायचा. धर्मेंद्र मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना सलमान त्यांची भेट घेण्यासाठी गेला होता. त्यानंतर अंतिम संस्कारावेळी आणि श्रद्धांजलीच्या वेळीही उपस्थित राहून सलमानने दिवंगत अभिनेत्याला श्रद्धांजली दिली.

बिग बॉस 19 मधील भावूक क्षण (Emotional Moment in Bigg Boss 19)

धर्मेंद्रच्या जाण्याची बातमी ऐकताच सलमान खान ‘बिग बॉस 19’च्या वीकेंड का वारमध्ये भावूक झाले. त्यांनी म्हटला , “देशाला मोठा धक्का बसला आहे… इंडस्ट्रीलाही मोठं नुकसान झालं आहे. तुम्ही समजत आहात मी कोणाबद्दल बोलतोय. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.”

धर्मेंद्र यांनी आयुष्यभर दिलेला प्रेमळ सहवास, आणि सलमानवर केलेलं वडीलकीचं प्रेमदोघांमधील नातं आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे.

ही बातमी वाचा: