Manna Dey Birth Anniversary : मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध पार्श्वगायक मन्ना डे (Manna Dey) यांची आज जयंती आहे. मन्ना डे यांचा जन्म 1 मे 1919 रोजी बंगाली कुटुंबात झाला होता. जेव्हा, गायक म्हणून रफी, मुकेश आणि किशोर यांच्या आवाजाला पसंती मिळत होती, त्या काळात मन्ना डे यांनी आपल्या अनोख्या आवाजाने स्वतःची दखल घ्यायला भाग पाडली. पाच दशकांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या मधुर कारकिर्दीत त्यांनी हिंदी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड आणि आसामी भाषेत अनेक गाणी गायली.
मन्ना डे यांनी कृष्णचंद्र डे आणि उस्ताद डबीर खान यांच्याकडून संगीताचे प्रशिक्षण घेतले. त्यांना 1950 मध्ये आलेल्या 'मशाल' चित्रपटात पहिल्यांदा एकच गाणे गाण्याची संधी मिळाली. या गाण्याचे बोल 'उपर गगन विशाल' असून, या गाण्याचे संगीत सचिन देव वर्मन यांनी दिले आहे. गायक मन्ना डे यांनी कधी शास्त्रीय, कधी रोमँटिक, कधी हलकीफुलकी, कधी भजन तर कधी पाश्चिमात्य गाणी देखील गायली आहेत.
एक चतुर नार
‘एक चतुर नार’ हे गाणे मन्ना डे आणि किशोर कुमार यांनी मिळून गायले होते. आजही हे गाणे बॉलिवूडमधील सर्वात मजेदार गाण्यांपैकी एक मानले जाते. आजही हे गाणे आवडीने ऐकले जाते.
ओ मेरी मैना
‘प्यार किये जा’ या चित्रपटातील या गाण्यातून मेहमूद आणि मन्ना डे यांच्या जोडीने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला होता.
ए मेरी जोहरा जबीं
मन्ना डे यांनी अभिनेता बलराज सहानी आणि त्यांच्या कारकिर्दीतील ‘ए मेरी जोहरा जबीं’ हे सर्वात सुपरहिट गाणे गायले. योगायोगाने दोघांचा वाढदिवसही एकाच दिवशी येतो. हे गाणे मन्ना डे यांच्या कारकिर्दीतील सर्वात सुपरहिट गाणे मानले जाते. आजची नवी पिढीही हे गाणे गुणगुणताना दिसते.
यारी है इमान
जेव्हा जेव्हा मन्ना डे यांनी प्राण यांच्यासाठी गाणे गायले, तेव्हा ते गाणे सुपरहिट झाले. हे गाणेही त्याचेच उदाहरण आहे. आजही हे गाणे प्रचंड ऐकले जाते.
प्यार हुआ इकरार हुआ हैं
‘प्यार हुआ इकरार हुआ हैं’ हे गाणे राज कपूर आणि नर्गिस यांच्या केमिस्ट्रीवर चित्रित करण्यात आले होते आणि आजही ते खूप लोकप्रिय आहे. या गाण्याला मन्ना डे यांनी आवाज दिला होता.
बाबू समझो इशारे
‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटातील हे गाणे किशोर कुमार यांच्यासोबत मन्ना डे यांनी देखील हे गाणे गायले होते. आजही हे गाणे प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
हेही वाचा :