मुबई : मानवाच्या नऊ भावनांचं चित्रण करणाऱ्या नवरस या बहुचर्चित मालिकेचा टीजर प्रदर्शित झाला आहे. या मालिकेची निर्मिती मणिरत्नम यांनी केली असून नेटफ्लिक्सवर ती लवकरच प्रदर्शित होणार आहे. ही मालिका पौराणिक कथेवर आधारित असून त्यामध्ये मानवाच्या शृंगार, वीर, करुणा,  हास्य, रौद्र, भीती,  बीभत्स, आश्चर्य आणि  शांत अशी नऊ रसांवर आधारित नऊ भागांची मालिका तयार करण्यात आली आहे. 


मणिरत्नमच्या नवरस या मालिकेची अनेकांना उत्सुकता होती. पण कोरोना काळामध्ये काही अडचणींमुळे चित्रिकरण वेळेत पूर्ण होऊ शकलं नाही. आता याचा टीजर प्रसिद्ध झाल्याने लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


नवरस या मालिकेच्या माध्यमातून सुरिया, विजय सेतुपती, पार्वती थिरूवातू, प्रकाशराज हे स्टार तसेच गौतम मेनन, अरविंद स्वामी, प्रियदर्शन यांसारखे दिग्दर्शक एकत्र आले आहेत.  






 


भारतीय साहित्यविचारात रसविचारांची मांडणी प्रथम भरतमुनी यांनी केली. याचे विस्तारित विवेचन अभिनवगुप्त यांनी केले. एकूण नऊ रस आहेत. भारताने आठ रस व त्यांचे आठ स्थायीभाव सांगितले आहेत. पुढच्या अभ्यासकानी शांत हा नववा रस व त्याचा शांती हा स्थायी भाव असल्याचं सांगितलं आहे. शृंगार, वीर, करुणा,  हास्य, रौद्र, भीती,  बीभत्स, आश्चर्य आणि  शांत असे नऊ रस आहेत. हे सर्व स्थायी भाव कमीअधिक प्रमाणात प्रत्येकाच्या ठिकाणी असतात.


महत्वाच्या बातम्या :