मुंबई : मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त के.नलिनाक्षन यांचं शुक्रवारी सकाळी निधन (bmc ex commissioner K nalinakshan dies)झालं. आपल्या घरात पूजा करत असताना त्यांच्या धोतीनं पेट घेतला. त्यात ते 80 ते 90 टक्के भाजले. त्यांना घटनेनंतर तात्काळ मसिना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी सकाळी पूजा करताना धोतीला लागली होती.
चर्चगेट येथील 'ए' मार्गावरील इमारतीत कुटुंबासोबत राहत होते. बुधवारी सकाळी ते रोजच्या प्रमाणे घरात पूजा करत होते. त्यावेळी अचानक त्यांच्या धोतीने पेट घेतल्याने ते 8 ते 90 टक्के भाजले. ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी घरातील देवघर असलेली खोली आतून बंद असल्याने त्यांच्या बचाव करणे शक्य झाले नाही, अशी माहिती त्यांचा मुलगा श्रीजीत यांनी दिली.
आयएएस अधिकारी असलेले नलिनाक्षन हे 1999 ते 2001 या कालावधीत मुंबई पालिकेचे आयुक्त होते. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारमध्ये अतिरिक्त मुख्य सचिव पदासह अन्य विभागांमध्ये कार्यभार सांभाळला होता. नलिनाक्षन यांच्या आयुक्त कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला लागून असलेल्या भुयारी मार्गाचे काम करण्यात आले होते.