Manasi Naik : अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत आलीये. नुकतच मानसीच्या एक्स नवऱ्याने साखरपुडा उरकला होता. त्यातच मानसी नाईकही कुणालातरी डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य सध्या चर्चेचा विषय आहे. यातच आता पुन्हा एकदा एका वेगळ्या कारणामुळे अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलीये. 


नुकतच परभणीत भाजपचे महानगरप्रमुख राजेश देशमुख यांच्या वतीने दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मानसीने भर पावसात तिच्या बहारदार लावणीने परभणीकरांना घायाळ केलं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधनाता मानसीने तिच्या राजकारणाच्या एन्ट्रीवर भाष्य केलं आहे. त्यामुळे मानसी नाईक राजकारणात येणार की नाही यावर तिने स्पष्टीकरण दिलंय. 


मानसी नाईकने काय म्हटलं?


राजकारणात यायला आवडेल का? या प्रश्नाचं उत्तर देताना मानसीने म्हटलं की, मला राजकारणात यायला नक्कीच आवडेल. राजकारणात सर्वच पक्षाचे नेते काम करत असतात. त्यांच्या मेहनतीने ते पुढे जातात. त्यामुळे मानसी नाईक लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.                                                                      


मानसी नाईकबद्दल जाणून घ्या... (Who is Manasi Naik)


मानसी नाईक अभिनेत्री असण्यासोबत एक उत्कृष्ट नृत्यांगणा आहे. तिने मराठी मालिका आणि सिनमांत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिने 2007 साली 'जबरदस्त' या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. पण 'चार दिवस सासूचे' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली. 'वाट बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर या' या तिच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 'जबरदस्त', 'फक्त लढ म्हणा' यांसारख्या सिनेमांतदेखील ती झळकली आहे.  






ही बातमी वाचा : 


Bhaucha Dhakka : भाऊचा निक्कीला कायमचा जोरदार धक्का, संपूर्ण सीझनमधली कॅप्टन्सी घेतली काढून 


Janhvi Kapoor : 'तुम अप्सरा हों या कोई परी,' ज्युनियर एनटीआरसोबत जान्हवीचा डान्स पाहून बॉयफ्रेंड झाला घायाळ