Alia-Ranbir Wedding : रणबीर-आलिया (Alia-Ranbir Wedding ) बॉलिवूडमधील या जोडप्याच्या लग्नाशी संबंधित प्रत्येक लहान मोठे तपशील जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. मग, ती लग्नाची तारीख असो, लग्नाचे ठिकाण किंवा लग्नाचा पोशाख. सध्या आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीरच्या (Ranbir Kapoor) लग्नाची चर्चा जोशात सुरू आहे. या लग्नात आलिया कोणत्या डिझायनरचे कपडे परिधान करणार, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.


सर्वांना माहीत आहे की, रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली असून, प्रत्येक दिवसागणिक लग्नाबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. पाहुण्यांच्या यादीपासून ते स्थळापर्यंत सर्वच गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान, नववधूच्या वेशभूषेबाबत चर्चांना उधाण आले आहे.


रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट तिच्या लग्नात सब्यसाची मुखर्जीचा पोशाख परिधान करणार आहे. याआधी कतरिना कैफ-विकी कौशल, करिश्मा तन्ना, मौनी रॉय-सूरज नांबियार, प्रियांका चोप्रा-निक जोनास, दीपिका पदुकोण-रणवीर सिंग, अनुष्का शर्मा-विराट कोहली, पत्रलेखा पॉल-राजकुमार राव यांसारखे अनेक सेलिब्रिटींसाठी सब्यासाचीने कपडे डिझाईन केले होते. अशावेळी आलियाही तिच्या लग्नात सब्यसाचीचाचं लेहेंगा परिधान करेल असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.


लग्नाची तयारी जोशात सुरु!


तारखेची अद्याप पुष्टी झालेली नसली, तरी यापूर्वी रणबीरने स्वतः लग्नाबाबत बोलण्यास होकार दिला होता. रणबीर आणि आलिया 17 एप्रिलला लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. त्याच वेळी, या जोडप्याच्या लग्नाचे इतर सोहळे 14 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. लग्नसोहळा सुरू होण्यापूर्वी दोघांची घरे सजवली जाणार आहेत. लग्नासाठी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित केले जात आहे. त्याचबरोबर लग्नानंतर आलिया आणि रणबीर मित्र आणि इंडस्ट्रीतील लोकांना ग्रँड रिसेप्शन पार्टी देणार आहेत.


हेही वाचा :