Ambika Rao : मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अंबिका राव (Ambika Rao) यांचे सोमवारी (27 जून) निधन झाले. रिपोर्टनुसार, ह्रदयविकाराच्या झटक्यानं त्यांचे निधन झाले. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  सोमवारी सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर एर्नाकुलम येथील एका खाजगी रुग्णायलात त्यांना दाखल करण्यात आलं. पण रात्री 10.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  रिपोर्टनुसार, अंबिका राव यांना कोरोनाची लागण देखील झाली होती आणि त्यांच्यावर उपचार सुरु होते. ‘कुम्बालांगी नाइट्स’या चित्रपटामधील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. 


अंबिका राव यांना दोन मुलं आहे. राहुल आणि सोहन अशी त्यांच्या मुलांची नाव आहेत. अंबिका राव यांच्या निधनानंतर मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली. सुपरस्टार पृथ्वीराजनं अंबिका राव यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानं सोशल मीडियावर अंबिका राव यांचा फोटो पोस्ट केला. 'अंबिका, तुमच्या आत्म्याला शांती लाभो' असं कॅप्शन पृथ्वीराजनं फोटोला दिलं. तसेच मल्याळम चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी अंबिका राव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 





‘कृष्ण गोपालकृष्ण’ या चित्रपटासाठी  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करुन त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन  बालचंद्र मेमम यांनी केलं होतं. अंबिका राव यांनी वीस वर्ष  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली. मिशा माधवन, सॉल्ट अँड पेपर, कुम्बालांगी नाइट्स आणि नुकताच प्रदर्शित झालेला अनुराग करिकिन वेल्लम, तमाशा आणि वेलम या चित्रपटांमध्ये अंबिका राव यांनी काम केले. 2019 मध्ये रिलीज झालेल्या कुम्बालांगी नाइट्स या चित्रपटामुळे  अंबिका राव यांनी विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटामधील अंबिका यांच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं. या चित्रपटामध्ये बेबी आणि सिम्मी या भूमिकेंच्या आईची भूमिका साकारली होती. 


हेही वाचा:


VP Khalid : शूटिंग दरम्यानच घेतला अखेरचा श्वास, प्रसिद्ध मल्याळम अभिनेते व्हीपी खालिद यांचे निधन