VP Khalid passes away : ज्येष्ठ टीव्ही अभिनेते व्हीपी खालिद (VP Khalid) यांचे शूटिंगदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. व्हीपी खालिद हे वक्कममध्ये त्यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवरील बाथरूममध्ये ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. नंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. व्हीपी खालिद हे टोविनो थॉमस यांच्या आगामी चित्रपटावर काम करत होते आणि शूटिंगदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.


चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनवर नाश्ता करून खालिद टॉयलेटमध्ये गेले होते. बराच वेळ ते परत न आल्याने, सेटवरील इतरांनी त्यांचा शोध घेतला असता, ते बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आले. तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


‘मरिमयम’ मालिकेतील भूमिकेसाठी होते प्रसिद्ध!


व्हीपी खालिद हे ‘मरिमयम’ मालिकेमधील ‘सुमेश’ या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी त्यांच्या विनोदाने आणि अभिनयाने अनेकांची मने जिंकली आणि चाहत्यांना भुरळ घातली. व्ही पी खालिद हे एक अतिशय लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी अलेप्पी थिएटर्समध्ये दीर्घकाळ काम केले होते. इतकंच नाही, तर त्याने चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका करायला सुरुवात केली होती. मात्र, टीव्ही मालिकांमध्ये काम करून त्यांनी प्रचंड प्रसिद्धी मिळवली होती. त्यांचे मुलगे शैजू, जिमशी आणि दिग्दर्शक खालिद रहमान देखील चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. अभिनेत्याच्या निधनानंतर चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत.


मनोरंजन विश्वावर शोककळा


व्ही पी खालिद यांनी आपल्या विनोदाने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने, त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने साऊथ मनोरंजनविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. व्हीपी खालिद आज या जगात नाहीत, पण त्यांचा अभिनय आणि त्यांच्या आठवणी कायम प्रेक्षकांच्या मनात असतील, ज्या कधीच विसरता येणार नाहीत.


संबंधित बातम्या


TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Judaa Hoke Bhi Trailer : भयपंटाचा बादशाह विक्रम भट्ट पुन्हा एकदा सज्ज; 'जुदा होके भी'चा ट्रेलर रिलीज


Sarsenapati Hambirrao : सरसेनापतींचा इतिहास जाणून घेण्यासाठी पाचव्या आठवड्यातही उसळतेय गर्दी; प्रविण तरडेंनी केली खास पोस्ट