Malaika Arora, Arjun Kapoor : सध्या बॉलिवूडमधील सेलिब्रिटी हे लग्न बंधनात अडकत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) यांचा विवाह सोहळा पार पडला. तसेच विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांनी देखील लग्नगाठ बांधली. आता मलायाका आरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे कधी लग्न करणार आहेत? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. लवकरच हे दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत.
चार वर्ष एकमेकांना करतायत डेट
मलायका आणि अर्जुन हे गेली चार वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. दोघे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये हे दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत, अशी चर्चा होत आहे. रिपोर्टनुसार, मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये अगदी साध्या पद्धतीनं या दोघांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. लग्नानंतर ग्रँड पार्टीचे आयोजन केले जाणार आहे. मलायका ही 48 वयाची आहे तर अर्जुन 36 वर्षाचा आहे. अर्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. वयात असणाऱ्या अंतरामुळे अर्जुन आणि मलायकाला अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. मलायका ही नेहमी ट्रोलर्सला उत्तरं देत असते. एका मुलाखतीमध्ये मलायका म्हणाली होती, 'आपण अशा समाजात राहतो, जो समाज बदलत्या वेळेनुसार प्रगती करत नाहिये. वयाने मोठा असणाऱ्या व्यक्ती त्याच्यापेक्षा लहान मुलीला डेट करत असेल तर ते या समाजाला मान्य आहे. पण जर एक मुलगी तिच्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्या मुलाला डेट करत असेल तर त्या मुलीला लोक म्हातारी आणि उतावळी म्हणतात. मी या लोकांकडे लक्ष देत नाही.'
मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. 1998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लग्नाआधी दोघांनीही जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते. त्या दोघांना अरहान नावाचा मुलगा आहे.
हेही वाचा :