Arjun- Malaika Breakup: बॉलीवूडमध्ये सध्या ब्रेकअपचे वारे वाहत असल्याचं पाहायला मिळतंय. नुकतच बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. त्यातच आता मलायका आणि अर्जुनचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे त्यांचं ब्रेकअप आता निश्चित झालं असल्याचंही म्हटलं जातंय.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर त्यांच्या ब्रेकअपच्या अफवांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. पण या जोडप्याने अद्यापही या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण आता मलायका आणि अर्जुनचे खरेच ब्रेकअप झाल्याचे दिसते आहे. खरं तर, एका इव्हेंटमधून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने या जोडप्याने आता वेगळे झाल्याच्या अफवांना दुजोरा दिला असल्याचं म्हटलं जातंय.
मलायका आणि अर्जुनने एकमेकांकडे केलं दुर्लक्ष?
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा नुकतेच एका फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे व्हिडिओमध्ये हे दोघेही एकमेकांकडे दुर्लक्ष करताना दिसत होते. व्हिडिओमध्ये मलायका आणि अर्जुन इव्हेंटमध्ये एकमेकांसोबत नसून वेगळे बसलेले दिसत आहेत. दोघेही एकमेकांपासून अंतर राखताना स्पष्टपणे दिसतात. अशा परिस्थितीत या व्हिडिओनंतर मलायका आणि अर्जुनचं खरंच ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जातंय.
मलायका आणि अर्जुनने 2018 मध्ये डेट करण्यास सुरुवात केली
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी 2018 मध्ये डेट करण्यास सुरुवात केली. पण मागील काही दिवसांपासून दोघेही सोशल मीडियावर ज्या काही पोस्ट करत आहेत, त्यावरुन त्यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. हॅलो मॅगझिन इंडियाशी बोलताना मलायका अरोरा हिने सांगितले की, ती खूपच रोमँटिक व्यक्ती आहे. त्यामुळे मी खऱ्या प्रेमाची कल्पना कधीच सोडणार नाही. अर्जुनच्या वाढदिवसाच्या पार्टीत मलायका अरोरा उपस्थित नव्हती. यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या अफवांना वेग आला. पण यावर या दोघांपैकी कुणीही अधिकृत भाष्य केलं नाहीये.