Malaika Arora-Arjun Kapoor Breakup : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) ही बॉलिवूडमधील चर्चात असणारी जोडी आहे. दोघेही एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. काही दिवसांपासून अर्जुन आणि मलायका यांच्या ब्रेकअपबद्दल सोशल मीडियावर चर्चे सुरू होत्या. त्याबद्दल अर्जुननं पोस्ट शेअर केली आहे. मलायकासोबतचा रोमँटिक फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये ब्रेकअपबद्दल सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चांबद्दल सांगितलं आहे.
मलायकासोबतचा फोटो शेअर करून अर्जुननं कॅप्शनमध्ये लिहिले, 'अशा अफवांना इथं जागा नाही. सर्वांनी सुरक्षित राहा. सर्वांचं चांगलं होण्यासाठी प्रार्थना करा. सर्वांना प्रेम. ' अर्जुनने शेअर केलेला मलाययकासोबतचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोवर लाइक आणि कमेंट अर्जुन आणि मलायकाच्या चाहत्यांनी केल्या आहेत.
मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. 1998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लग्नाआधी दोघांनीही जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते. त्या दोघांना अरहान नावाचा मुलगा आहे.
संबंधित बातम्या