Mahesh Manjrekar On Raj-Uddhav Thackrey: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politicle Updates) सध्या जोरदार चर्चा सुरूये ती, शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackrey Group) आणि मनसेच्या (MNS) युतीची. महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनातील कित्येक वर्षांपासूनचं स्वप्न यानिमित्तानं पूर्ण होणार आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाराष्ट्र सरकारच्या हिंदी सक्तीच्या (Hindi Language) जीआरविरोधात आक्रमक झाले आहेत. मायमराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू आता एकत्र आलेत. दोघेही याजीआरविरोधात एकत्र मोर्चा काढणार होते. पण, सरकारनं हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. आता दोन्ही बंधू विजयोत्सव साजरा करणार आहेत. तर, आगामी निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष युती करणार असल्याचंही बोललं जात आहे. अशातच काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर (Director Mahesh Manjrekar) यांनी राज-उद्धव यांनी एकत्र येणाबाबत भाष्य केलं होतं. अशातच आता पुन्हा एकदा महेश मांजरेकरांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.
'न्यूज 18'च्या समृद्ध महाराष्ट्र कार्यक्रमात महेश मांजरेकर उपस्थित होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, "महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनातला प्रश्न मी राज ठाकरेंना विचारला होता. त्यानंतर असं काही होईल याचा मी विचारच केला नव्हता. पण मला कायम वाटतं की, महाभारतापासून आपल्याकडे हा इतिहास राहिला आहे की, का दोन भाऊ एकत्र येऊ शकत नाहीत? तोच इतिहास पुन्हा घडवण्यापेक्षा आपण तो बदलू शकत नाही का?" यावर पुढे महेश मांजरेकरांना प्रश्न विचारलेला की, राज-उद्धव खरंच एकत्र येतायत का? नक्की काय चाललंय? यावर महेश मांजरेकर हसत हसतच म्हणाले की, "ते मला काही माहित नाही."
आम्ही अशा क्षेत्रात आहोत, जिथे राजकीय मत देणं जरा अवघड होऊन जातं : महेश मांजरेकर
मराठी भाषा सक्तीबाबत आपल्याकडे कलाकार भूमिका मांडत नाहीत, असा थेट आरोप होतोय, त्याबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले की, "आम्ही अशा क्षेत्रात आहोत, जिथे राजकीय मत देणं जरा अवघड होऊन जातं. मी राजकीय व्यासपीठावर केवळ एक मित्र म्हणून तिथे असतो. माझं मत विचाराल तर मी 'शिक्षणाच्या आईचा घो' हा सिनेमा काढला होता. मला मुलांवर अभ्यासाचा काय दबाव असतो, हे माहीत आहे. त्यांच्यावर तिसरा विषय लादायचा का? माझं म्हणणं आहे की, तुम्हाला हिंदी पहिली पासून शिकवायची आहे तर शिकवा. पण जर मला फक्त दोनच भाषा हव्या आहेत, तर मला तशी मुभा असावी. ज्यांना हवी असेल त्यांना घेऊद्या. हिंदी विरुद्ध असं काही नाही पण मुलांवर एका जास्तीच्या भाषेचा बोजा कशाला टाकायचा?"
"हिंदीला विरोध असं काहीच नाहीये, कारण आम्ही त्याच इंडस्ट्रीत काम करतो. माझं फक्त म्हणणं हे आहे की, ते दोन भाषा शिकत होते, त्यांच्यावर आणखी एका भाषेचा बोजा टाकायचा का? आता परवाची बातमी आहे की, कुठल्यातरी विषयात कमी मार्क मिळाले म्हणून वडिलांनी मुलीला ठार मारलं. नंबर देताना माझा काय गोंधळ होतो की, हा पहिला आणि हा दुसरा... म्हणजे, कुणी ठरवायचं की, हा पहिला आणि हा दुसरा... म्हणजे, तो शाळेत चांगले मार्क मिळवून पहिला आणि दुसरा का? तो कदाचित स्पोर्ट्समध्ये चांगला असेल, तुम्ही जज करु नका. तुम्ही ग्रेड द्या. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत माझी मतं जरा टोकाची आहेत..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :