Vanita Kharat : महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi HasyaJatra) फेम अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) हीने काही महिन्यांपूर्वी सुमित लोंढे याच्यासोबत लग्नगाठ बांधली. वनिताने तिच्या लग्नात घेतलेला उखाणा देखील विशेष पसंतीस पडला होता. त्यानंतर होळीनिमित्त तिने घेतलेला उखाणा पुन्हा एकदा चाहत्यांच्या पसंतीस पडतोय.  वनिता तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे कायमच तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यातल्या गोष्टी सांगत असते. 


होळी आणि धुळवडीचा माहोल सध्या सगळीकडे पाहायला मिळतोय. लाडके कलाकार देखील त्यांच्या कुटुंबियांसोबत सण साजरे करत असल्याचं पाहायला मिळतंय. नुकतच लग्न झालेल्या वनिता खरातनेही तिचा लग्नानंतरचा पहिला सण साजरा केल्याचं पाहायला मिळालं आहे. वनिताच्या कॉमेडीच्या टायमिंगमुळे आणि अभिनयाच्या जोरावर ती कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. छोट्या पडद्यासह वनिताने रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाची छाप उमटवल्याचं पाहायला मिळालं आहे. 


वनिताचा खास उखाणा


लग्नानंतरचा पहिला सण म्हणून वनिता आणि सुमितने होळीची पूजा केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी वनिताने खास उखाणा देखील घेतला. या उखाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. होळीवर माळ चढवली होती हिरव्या गुलाबी गोंड्यांची, सुमितरावांचं नाव घेते झाले मी सून लोढ्यांची', असा उखाणा यावेळी वनिताने घेतला.






वनिताचे चित्रपट


वनिताचा पती सुमित लोंढे हा एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. तसेच तो व्हिडीओ क्रिएटर असण्यासोबत ब्लॉगरदेखील आहे. तर वनिता ही विविध कार्यक्रम आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. वनिताचा सरला एक कोटी हा चित्रपट 20 जानेवारी या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात तिनं गुड्डी ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटात वनितासोबतच ईशा केसकर, ओंकार भोजने, छाया कदम, कमलाकर सातपुते यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच तिनं कबिर सिंह या चित्रपटामध्ये देखील काम केलं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे वनिताला विशेष लोकप्रियता मिळाली. वनिताच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असते.


ही बातमी वाचा : 


Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate: काकूबाई! मुग्धा-प्रथमेशच्या फोटोवर ट्रोलर्सच्या कमेंट्स; माकड म्हणतं आपलीच लाल.., बायकोला बोलणाऱ्यांना प्रथमेशचं चोख उत्तर