काही मालिका आणि त्यातली पात्र ही त्यांच्या भूमिकांमुळे फार प्रसिद्ध होतात मग ते अगदी चित्रपटपासून ते नाटका पर्यंत प्रत्येक पात्र हे खास असतं असं म्हंटल जात. सध्या ज्या मालिकेची सर्वदूर होत आहे ती म्हणजे झी मराठीवर "अग्गंबाई सासूबाई" या मालिकेतील एक पात्र हे एवढं फेमस झालं आहे की त्यावरून सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव होतो. या मालिकेतील सोहम अर्थात "बबड्या" हा खूप जास्त व्हायरल आणि प्रसिद्ध आहे तो त्यांचा कामगिरीमुळे. आसवरीचा बबड्या हा आता मीम्स मटेरियल झाला आहे.
कोरोना काळात महाराष्ट्रातले पोलीस सक्रीय झाले. कामगिरी बजावतानाच सोशल मीडियाचाही वापर ते जोरदार करू लागले. अनेकांचे फोटो.. सिनेमांचे प्रसंग वापरून संदेश देण्याकडे महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांचा कल असतो. आता पुणे आणि नाशिकचे पोलिसही असे सल्ले देऊ लागले आहेत. लोकांनाही हे संदेश आवडतात महाराष्ट्र पोलीस त्यांच्या सोशल मीडियावर भन्नाट मिम्स शेयर करतात. जनजागृती करताना अनेकदा मिम्स हे फार उपयोगी ठरतात. महाराष्ट्र पोलिसांचे काही मिम्स इतके व्हायरल होतात की मग सोशल मीडियावर त्यांच्या चर्चा होतात. असचं मुंबई पोलिसांच ट्विट महाराष्ट्र पोलिसांनी केलं असून या ट्विटची सोशल मीडियावर भलतीच चर्चा रंगली आहे.
तुम्ही माझ्यासाठी देवदूत आहात, रिया-महेश भट्ट यांच्यातले मेसेज उघड
'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतील सोहम म्हणजे बबड्या हे पात्र काहीसं नकारात्मक आहे आणि तेवढंच चर्चेत आहेत. याचा आधार घेत पोलिसांनी एक मिम तयार केलं आहे. बबड्याचा मास्क घातलेला फोटो शेयर करत "तो एक जवाबदार नागरिक" असल्याचं या मिममध्ये म्हंटल आहे. ते ट्विट करताना महाराष्ट्र पोलीस म्हणतात "बबड्या मास्क लावतो बबड्या खरंच सुधारला आहे" असं त्यांनी म्हंटल आहे. कथानकात ट्विस्ट आहे!" बबड्या चांगला की वाईट आम्हाला ठाऊक नाही. परंतु, बबड्या एक जबाबदार नागरिक नक्की आहे" असं सांगत त्यांनी हे भन्नाट ट्विट केलंय.
पोलिसांनी बनवलेल्या या मिम्सला नेटकऱ्यांनी भारीच प्रतिसाद दिला आणि होऊ दे व्हायरल म्हणत हे ट्विट जबरदस्त व्हायरल केलंय. मालिकेतून आपल्या कट कारस्थानासाठी ओळखला जाणारा सोहम हा खूपदा नेटकऱ्यांच्या हक्काचा मिम मटेरियल होऊन जातो. कोरोनाच्या काळात नागरिकांना नियम सांगण्यासाठी पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवरून वेळोवेळी अश्या भन्नाट संकल्पना असलेले ट्विट करण्यात येतात. हल्लीच्या तरुणांचा "मिम" हा आवडीचा विषय आहे, म्हणून चक्क पोलिसांनी देखील हा हटके मार्ग स्वीकारत सोशल मीडियावर आपली अनोखी ओळख निर्माण केली आहे.
SSR Farm House | सुशांत सिंहच्या फार्म हाऊसवर एबीपी माझा, सुशांतने विश्रांतीचा प्लॅन का रद्द केला?