मुंबई : कच्छच्या रणापासून सुरुवात करून, रश्मि रॉकेट एका गावकरी तरुणीची कथा आहे, जिच्याकडे, वेगवान धावण्याची शक्ती आहे. ती एक अविश्वसनीय वेगवान धावपटू आहे आणि त्यामुळे गाववाले तिला 'रॉकेट' म्हणूनच ओळखतात. जेव्हा आपल्या प्रतिभेला व्यावसायिक रुपात साकारायची तिला संधी मिळते तेव्हा या संधीला ती वाया जाऊ देत नाही. फिनिश लाइनपर्यंत पोहोचण्याची ही शर्यत अनेक अडथळ्यांची आहे आणि एका एथलेटिक्स प्रमाणेच ही शर्यत देखील तिच्यासाठी सन्मान, आदर आणि इतकेच नव्हे तर स्वतःला सिद्ध करण्याच्या लढाईत परावर्तित होऊन जाते.


अभिनेत्री तापसी पन्नू अभिनित स्पोर्ट्स ड्रामा 'रश्मि रॉकेट'च्या चित्रीकरणाला येत्या नोव्हेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. नंदा पेरियासामी, अनिरुद्ध गुहा आणि कनिका ढिल्लन यांच्याद्वारे लिहिण्यात आलेली असून आकर्ष खुराना यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री तापसीसोबत या चित्रपटात 'एक्सट्रैक्शन' फेम प्रियांशु पेंथुली प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपटाच्या चित्रिकरणाविषयी आणि आपल्या भूमिकेविषयी बोलताना तापसी म्हणाली की “मी या प्रॉजेक्टमध्ये अगदी सुरुवातीपासून सहभागी आहे आणि त्यासाठी हे सर्व माझ्यासाठी खास आहे. कोरोनाच्या अगदी आधी, मी एका स्प्रिंटरच्या व्यक्तिरेखेत उतरण्यासाठी 3 महिन्यांपासून ट्रेनिंग घेत होते. हा एक मोठा ब्रेक झाला आहे मात्र या विषयामुळे पुन्हा एकदा याची सुरुवात करायला उत्सुक आहे ज्याची सुरुवात ट्रेनिंगने होईल."

दिग्दर्शक आकर्ष खुराना याविषयी बोलताना म्हणाले की, "आम्ही चित्रीकरणाला सुरुवात केली होती तेव्हा कोरोना रोगराईला सुरुवात झाली होती. मला आनंद आहे की आम्ही लवकरच चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात करतो आहोत. माझी टीम आणि मी या प्रवासाला सुरुवात करण्याची आतुरतेने वाट पाहतो आहोत. ही एक शानदार कहाणी आहे जिला सांगण्यासाठी मी फार उत्सुक आहे."

देव डी, लुटेरा, क्वीन, केदारनाथ सारख्या चित्रपटांचे संगीतकार अमित त्रिवेदी आता 'रश्मि रॉकेट'मध्ये आपल्या संगीताने रंग भरणार आहेत. नेहा आनंद आणि प्रांजल खंडाड़िया यांच्यासोबत रॉनी स्क्रूवाला यांची निर्मिती असलेला 'रश्मि रॉकेट' 2021 मध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.