Samay Raina Show India's Got Latent : यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने (Ranveer Allahbadia Controversy) पालकांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर समय रैनाच्या तसेच त्याच्या इंडियाज गॉट लेटेन्ट या शोच्या अडचणी वाढल्या आहेत. या शोवर बंदी घालावी, या मागणीने जोर धरला होता. असे असतानाच आता महाराष्ट्र पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने समय रैनाला इंडियाज गॉट लेटेन्टचे एकूण 18 भाग डिलिट करावेत, असे निर्देश दिले आहेत.
गुन्हा दाखल आता पोलीस अॅक्शन मोडमध्ये
समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेन्ट या शोमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर देशभरातून चांगलाच संताप व्यक्त करण्यात आला. या शोमध्ये सहभाजी झालेल्या कॉमेडियन्सच्या पॅनलवर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती. काही संघटनांनी तर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विणी वैष्णव यांना पत्र लिहून तशी मागणी केली होती. सोबतच रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्यावरही कारवाई करावी, असे म्हटले जात होते. त्यानंतर दाखल तक्रारीनुसार महाराष्ट्र सायबर पोलिसांनी एफआयआर दाखल केली असून पुढील तपास चालू केला आहे.
एकूण 30 जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र पोलिसांनी समय रैना, बलराज घाई तसेच अन्य काही लोकांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार इंडियाज गॉट लेटेन्टच्या ताज्या एपिसोडमधील वादग्रस्त भाग पाहून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 तसेच भारतीय न्याय संहितेच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एफआरआयनुसार एकूण 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रणबीर अलाहाबादियाने मागितली माफी
दरम्यान, या निर्णयानंतर आता समय रैना नेमका काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या प्रकरणात यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने जाहीर माफी मागितलेली आहे. कोणतेही स्पष्टीरण, कारण न देता मला माफ करा, असे अलाहाबादियाने म्हटले आहे. सोबतच आक्षेपार्ह भाग व्हिडीओतून डिलीट करावा, अशी विनंतीही त्याने इंडियाज गॉट लेटेन्टला केली होती.
हेही वाचा :
रणवीर अलाहाबादिया, समय रैनाचा पाय आणखी खोलात, 'इंडियाज गॉट लेटेन्ट'वर बंदी घालण्याची मागणी!
Ranveer Allahbadia च्या वैयक्तिक आयुष्यातही वादळ, वादग्रस्त वक्तव्यानंतर गर्लफ्रेंडनंही केलं ब्रेकअप