Ranveer Allahbadia Controversy On India's Got Latent : प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया सध्या चांगलच वादात सापडला आहे. इंडियाज गॉट लेटेन्ट या कार्यक्रमात त्याने पालकांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे रणवीरने या विधानाबाबत माफी मागितली आहे. पण तरीही हा वाद संपताना दिसत नाहीये. असे असतानाच आता इंडियाज गॉट लेटेन्ट या कार्यक्रमावरच बंदी घालावी, अशी मागणी केली जात आहे.
अमित शाहा यांना लिहिले पत्र
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोशिएशनने इंडियाज गॉट लेटेन्ट या कार्यक्रमावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. तशा आशयाचे पक्षच या संस्थेने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांना लिहिले आहे. या कार्यक्रमावर बंदी घालावी तसेच या कार्यक्रमाची निर्मिती करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या संस्थेने केली जात आहे.
विशेष म्हणजे या संस्थेने समय रैना, रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा माखिजा, जसप्रितस सिंह, आशिष यांचाही निषेध केला आहे. कौटुंबिक मुल्ये तसेच अन्य मर्यादा ओलांडणारी वक्तव्ये यांनी इंडियाज गॉट लेटेन्ट या कार्यक्रमात केली आहेत, असेही या संस्थेने म्हटले आहे.
नॅशनल कन्टेन्ट क्रियेटर पुरस्कार मागे घ्यावा
दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी हे पत्र लिहले आहे. रणवीर अलाहाबादिया याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिलेला "नॅशनल कन्टेन्ट क्रियेटर अवॉर्ड 2024" हा पुरस्कार मागे घ्यावा आणि फक्त 'disruptor of the year' हा पुरस्कार द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
फडणवीसांनी कारवाई करण्याची मागणी
या वादग्रस्त व्यक्तीला मोदी यांच्या हस्ते पुरस्कार दिला असा उल्लेख इतिहासात राहील त्यामुळे हा पुरस्कार मागे घ्यावा. शिवाय इतर ठिकाणी गुन्हे दाखल होत असतानाच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त कठोर शब्दात टीका करत आहेत. ते कठोर कारवाई करत नाहीयेत, त्यामुळे त्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणीही अखिल चित्रे यांनी केली आहे.
महाराष्ट्र महिला आयोगानेही घेतली दखल
दुसरीकडे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी केलेल्या तक्रारीचीही महाराष्ट्राच्या महिला आयोगाने दखल घेतली आहे. त्यामुळे इंडियाज गॉट लेटेन्ट हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
हेही वाचा :