Maharashtra Bhushan Puraskar 2023: राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार गेली सात दशकांपासून आयोजित केला जात आहे.  पद्मविभूषण ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle Latest News) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (sachin tendulkar latest news) उपस्थित होता. या पुरस्कार स्वीकारल्यानंतर आशा भोसले (Asha Bhosle Latest News) म्हणाल्या आहेत की, ''महाराष्ट्र भूषण हा सन्मान घरच्यांनी दिला, तो मला भारतरत्न सारखा आहे.''






यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना आशा भोसले (Asha Bhosle Latest News)  म्हणाल्या की, ''मी फक्त मराठी नाही तर संपूर्ण भारतची कन्या आहे. माझे आईवडील, गुरु आणी दीदी यांचा मला आशीर्वाद आहे. म्हणून आज या ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया महाराष्ट्र शासनाने मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आहे.'' या पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.


Maharashtra Bhushan Puraskar 2023: 1933 साली पाहिलं गाणं रेकॉर्ड केलं 


त्या (Asha Bhosle Latest News)  पुढे म्हणाल्या की, ''मुलगी बऱ्याच दिवसांनी माहेरी आली की तीच कौतुक होतं. तसं मला आज वाटतंय. मी महाराष्ट्राची मुलगी आहे आणि आज मला माहेरी आल्या सारखं वाटतंय.'' आशा भोसले (Asha Bhosle Latest News)  म्हणाल्या की, ''1933 साली सप्टेंबर महिन्यात माझं पाहिलं गाणं 'माझं बाळ' या सिनेमासाठी रिकॉर्ड केलं. त्यावेळी मी फक्त 10 वर्षांची होते. तेव्हा भारताला स्वतंत्र मिळालं नव्हतं. तेव्हापासून मी गात आहे आणि गात राहणार.''


इतर महत्वाची बातमी: 


Rahul Gandhis Disqualification : देशातील ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी राहुल गांधींवर ही कारवाई, पत्रकार परिषद घेत काँग्रेसचा गंभीर आरोप