Kushal Badrike : 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा घराघरांत पोहचला. या कार्यक्रमामुळे त्याला विनोदी अभिनेता म्हणूनही ओळख मिळाली. पण 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa yeu dya) या कार्यक्रमाने निरोप घेतल्यानंतर तो हिंदीतही झळकला. सोनी टिव्हीवरील 'मॅडनेस मचाऐंगे' (Madness Machayenge) या कार्यक्रमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण आता हा कार्यक्रम देखील प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यानिमित्ताने कुशलने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 


हिंदीतील या कार्यक्रमामुळे कुशलला हिंदीत काम करण्याची संधी मिळाली. यानिमित्ताने त्याला पुन्हा एकदा हिंदीतील अनेक दिग्गजांसमोर काम करण्याचाही अनुभव आला. याविषयी देखील कुशलने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मॅडनेस मचाऐंगे या कार्यक्रमाचे शेवटचे दोन भाग प्रदर्शित होणार आहे. 


कुशलने पोस्टमध्ये काय म्हटलं?


कुशलने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं की, “हिंदी म्हणजे आयुष्यात आलेली सगळ्यात मोठ्ठी संधी” असं काही मला वाटत नाही ! पण माझा “अमोल पणशीकर” नावाचा मित्र मला कायम म्हणतो, “स्वतःच कॅनव्हास मोठं कर म्हणजे चित्र काढायला मजा येईल आणि ते रंगवायलाही !" म्हटलं, एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. मला खरच मजा आली, खूप वेगळा आणि खूप चांगला अनुभव आला. नवीन मित्र मिळाले, नवीन शिकायला मिळालं.आज आणि उद्या ह्या हिंदी कार्यक्रमाचे शेवटचे भाग टेलिकास्ट होत आहेत नक्की बघा “मॅडनेस मजायेंगे” सोनी हिंदीवर. आणि एक गोष्ट अनुभवली, आयुष्याला रंगत येण्यासाठी अख्खं आभाळ रंगवायची गरज नाही, माणसाला स्वतःपुरतं इंद्रधनुष्य होता आलं, की पुरेसं होतं.






कुशल बद्रिकेने शेअर केले फोटो


या पोस्टमध्ये कुशलने सेटवरचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. या कार्यक्रमातील धम्माल क्षण कुशलने शेअर केलेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत कुशलला त्याच्या पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.                                                       


ही बातमी वाचा : 


Anant Ambani-Radhika Merchant wedding : अंबानींच्या लग्नसोहळ्यामुळे वाहतूक मार्गांत बदल, 'या' तारखांना पर्यायी मार्गाने मुंबईकरांना करावा लागणार प्रवास