Madhuri Dixit Join Politics: बॉलिवूडची (Bollywood News) 'धकधक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आजही लाखो लोकांच्या गळ्यातील ताईत आहे. मोठ्या पडद्यावर आपल्या अदांनी अवघ्या जगभरातील चाहत्यांना वेड लावल्यानंतर माधुरी आता 'मिसेस देशपांडे' या वेब सीरिजद्वारे (Web Seires) ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) पदार्पण करणार आहे. माधुरी तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतेच, पण सध्या माधुरी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून माधुरी दीक्षित राजकारण प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. पण, आता अभिनेत्रीनं स्वतः यावर वक्तव्य केलं आहे.
2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांवेळी माधुरी दीक्षित निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला. पण, त्यावेळी त्या चर्चाच राहिल्या. पण, आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. अशातच आता माधुरी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता माधुरीनं स्वतः यावर वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
माधुरी राजकारणात प्रवेश करणार?
एएनआय या वृत्तसंस्थेला माधुरीनं नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत माधुरीनं तिच्या राजकारण प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. मुलाखतीत बोलताना माधुरीनं राजकीय मार्ग स्विकारणार नसल्याचं म्हटलं आहे. तिनं जोर देऊन सांगितलंय की, ती तिच्या कलात्मक प्रयत्नांद्वारे इतरांना प्रेरणा देण्यास प्राधान्य देणार आहे.
अभिनेत्री माधुरी दीक्षित म्हणाली की, "मलाही नक्की माहीत नाही... मला वाटत नाही की, राजकारण माझं काम आहे... माझं ध्येय एक आर्टिस्ट बनणं आणि त्यादृष्टीकोनातून जागृती करणं असो किंवा विचार शेअर करणं... दुसऱ्यांची मदत करणं हाच आहे... सध्या तरी मी स्वतःला अशीच पाहातेय..."
"राजकारणात येणं कधीच माझं ध्येय नव्हतं... मला स्वतःला मी तिथे योग्य वाटत नाही... एक कलाकार म्हणून मी जे करिन ते मला राजकारणापेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहे, असंच वाटतं..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :