Jahnavi Killekar Hospitalized After Suraj Chavan Wedding: 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणनं (Suraj Chavan) नुकतीच त्याच्या मामाच्या मुलीसोबत लग्नगाठ बांधली. मोठ्या थाटामाटात सूरज चव्हाणचा लग्नसोहळा (Suraj Chavan Wedding) पार पडला. सूरज चव्हाणनं लग्न करत असल्याचं जाहीर केल्यापासूनच त्याच्या लग्नाबाबत मोठा उत्साह चाहत्यांमध्ये होता. त्याची होणारी बायको कोण? तो कुठे लग्न करणार? त्याच्या लग्नाला कोण-कोण उपस्थित असणार? याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. पण, सूरजचा अगदी डोळे दिपवणारा विवाहसोहळा होता, सोशल मीडियावर त्याच्या लग्नापूर्वीच्या आणि लग्नानंतरच्या सर्वच विधींचे फोटो व्हायरल होत होते. पण, सूरज चव्हाणच्या लग्नसोहळ्या त्याच्यावर आणि त्याच्या होणाऱ्या बायकोवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्याच. पण, त्यासोबतच आणखी एका व्यक्तीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं. सूरज चव्हाणच्या लग्नसोहळ्यात बिग बॉसच्या घरात सूरजसोबत झळकलेली, त्याची बहीण अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) अगदी सावलीसारखी त्याच्यासोबत वावरताना दिसली. जान्हवी अगदी उत्साहानं सूरजच्या लग्नात सहभागी झालेली. जान्हवीने सूरज आणि त्याच्या पत्नीसोबत डान्सही केलेला. पण, आता सूरजचं लग्न आणि तिथे अगदी कलवरीसारखं मिरवणं जान्हवीच्या चांगलंच अंगलट आलंय. त्याला कारणंही तसंच आहे. सूरजच्या लग्नावरुन परतल्यावर जान्हवीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
सूरज चव्हाणचं 29 नोव्हेंबर 2025 रोजी धुमधडाक्यात लग्न पार पडलं. सोशल मीडियावर सूरजच्याच लग्नाची चर्चा पाहायला मिळतेय. सूरजचं सासवडला लग्न लागलं. सूरजच्या लग्नसोहळ्याचा थाट पाहण्यासारखा होता. या सोहळ्यात अभिनेत्री जान्हवी किल्लेकर अगदी उत्साहात सहभागी झालेली. सूरज चव्हाणच्या लग्नसोहळ्यात उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल चाहते जान्हवी किल्लेकरचं सर्वांनी कौतुकही केलं. लग्नसोहळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यावर जान्हवी उपस्थितांवर संतापली आणि गर्दी न करण्याचं आवाहन केलं. त्यामुळे सूरजच्या लग्नात भाव खाऊन गेलेली जान्हवी सर्वांच्या लक्षातही राहिली. मात्र, लग्न आटोपल्यानंतर मात्र आता जान्हवी आजारी पडली आहे. तिला 'कोकिलाबेन धीरूभाई अंबानी' या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
चाहते काळजीत, तर काहींनी सुनावलंही
जान्हवीनं रुग्णालयातला फोटो शेअर करुन सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये जान्हवीला रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलंय. तर, तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "नजर इज रिअल". जान्हवीच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिला काळजी घ्यायला सांगितलं आहे. तसेच, कमेंट्स करत तिची विचारपूसही केली आहे. एका युजरनं लिहिलंय की, "छान दिसत होती म्हणून नजर लागली असेल...", तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "तब्येतीची काळजी घे आता..." जान्हवीच्या सर्व चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचं आवाहन केलंय. तर काहींनी मात्र जान्हवीलाच सुनावलंय. "लग्न महागात पडलं वाटतं", "लग्नात भरपूर नाचलेल्याचा परिणाम", "सुरजच्या लग्नात उड्या मारून पडली आजारी", "हळद आणि लग्न जरा जास्तच झालं वाटतं", अशाही कमेंट्स केल्या आहेत.
जान्हवीकडून भावासाठी खास गिफ्ट...
Bigg Boss Marathi 5 च्या घरात एकमेकांवर मात करुन पुढे जाणं, स्पर्धा करणं यासोबतच अनेक नवी नाती निर्माण झाली. शो संपल्यानंतर अनेकांनी ती नाती त्याच प्रेमानं, मायेनं जपली. त्यापैकीच एक म्हणजे, जान्हवी आणि सूरजचं भावा-बहिणीचं नातं. सूरजच्या लग्नसोहळ्यात हळद, साखरपुड्यापासून ते वरातीत नाचण्यापर्यंत जान्हवी सहभागी झाली होती. सूरजचं लग्न लागल्यानंतर तिने एक खास व्हिडीओही शेअर केला, ज्यात तिनं त्याला दिलेल्या गिफ्टची झलक पाहायला मिळाली. जान्हवीनं सूरजला एक सोन्याची अंगठी गिफ्ट म्हणून दिलीय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
