बीड: राज्यातील राजकारण बीडमधील गुन्हेगारी आणि खून प्रकरणावरून ढवळून निघत आहे. अशातच विधानसभेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये झालेले गुन्हे, खून, हत्येचे प्रयत्न यांची माहिती दिली आहे. नुकतंच बीडच्या गुन्हेगारीवरून महायुतीच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर आता या प्रकरणाच्या मोठ्या चर्चा होताना दिसत आहेत. बीडमध्ये पाच वर्षात तब्बल 276 हत्या झालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहांमध्ये याबाबत लेखी उत्तर दिले आहे. 276 जणांची बीडमध्ये हत्या झालेली आहे. तर 766 जणांनी पाच वर्षात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. विशेष म्हणजे दहा महिन्यात एकूण 36 हत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तर 260 जणांना शस्त्र परवाने देण्यात आले होते. मात्र, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर 199 जणांचे शस्त्र परवाने परत घेतले असल्याची ही माहिती आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड मधील गुन्हेगारी आणि वास्तव समोर आलं. या सर्व घडामोडीनंतर कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माहितीतील मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा सादर केला. त्यानंतर आता सभागृहामध्ये याबाबत माहिती समोर आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये पाच वर्षात 276 खून झाल्याची माहिती दिली आहे, तर 766 जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची त्यांनी माहिती दिली आहे. तर गेल्या दहा महिन्यांमध्ये 36 खुणाच्या घटना उघडकीस आल्याची कबुली देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यात मागील दहा महिन्यांत म्हणजेच जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत तब्बल 36 खून झाले आहेत. त्याचबरोबर, मागील पाच वर्षांत 276 हत्या आणि 766 हत्येचे प्रयत्न झाले असल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे.
हे आकडेवारी सादर करताना मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी परिस्थिती आणि त्यावर सरकारच्या उपाययोजनांबाबतही माहिती दिली. बीड जिल्ह्यात 260 जणांकडे शस्त्र परवाने असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यातील 99 परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत झालेल्या गुन्ह्यांचे पुनरावलोकन करताना असे आढळले की, अनेक गुन्हेगारांकडे अधिकृत शस्त्र परवाने आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाने 99 शस्त्र परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
बीडमध्ये ही हत्या प्रकरणं आली चर्चेत
गेल्या काही महिन्यांत बीड जिल्ह्यात अनेक हत्या प्रकरणं चर्चेत आली आहेत. त्यापैकी काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयितांना अटक केली आहे. तसेच केज येथील पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे. तसेच, मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. अनेक आरोप प्रत्यारोप या प्रकरणात झाले आहेत. धनंजय मुंडे यांना या प्रकरणी राजीनामा द्यावा लागला.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण
महादेव मुंडे हत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.