Madhugandha Kulkarni Post On Aarpar Movie: सध्याच्या आठवड्यात मराठी सिनेसृष्टीत काँटे की टक्कर पाहायला मिळाली. एकाच आठवड्यात, एकाच दिवशी तीन मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर रिलीज करण्यात आले. 'दशावतार' (Dashavatar Movie) , 'आरपार' (Aarpar Movie) आणि 'बिन लग्नाची गोष्ट' (Bin Lagnachi Goshta) हे तिन्ही सिनेमे सध्या जोरदार चर्चेत आहेत. अशातच सोशल मीडियावर 'आरपार' सिनेमा (Aarpar Marathi Movie) चांगलाच चर्चेत आहे.
ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) आणि हृता दुर्गुळे (Hruta Durgule) यांचा 'आरपार' सिनेमा शुक्रवारी, 12 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला. सिनेमाला प्रेक्षकांकडूनही चांगली पसंती मिळत आहे. 'आरपार' या सिनेमामध्ये ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत आहेत, पण त्याचबरोबर तो सिनेमाचा निर्मातासुद्धा आहे. अशातच आता ललितसाठी एका मराठी अभिनेत्रीनं पोस्ट केली आहे. अभिनेत्री आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णीनं खास पोस्ट लिहिली आहे.
इन्स्टाग्राम पोस्टमध्ये काय लिहिलंय मराठमोळ्या निर्मातीनं?
अभिनेत्री आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णीनं सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. इन्स्टाग्रामवर मधुगंधा कुलकर्णी यांनी 'आरपार' या सिनेमाचं पोस्टर शेअर करुन लिहिलं आहे की, "ललितचा पिक्चर आला म्हणून बघितला. वेडसर प्रेम बघण्याची मजा काही औरच असते. गौरव पत्कीचा पहिला प्रयत्न खूपच कौतुकास्पद आहे. टेक्निकली सगळं perfect! माधव अभ्यंकर सर, सुहिता थत्ते, स्नेहलता वसईकर, पाहुणे कलाकार म्हणून सुहास शिरसाट सगळे कलाकार उत्तमच! सगळ्यात कमाल वाटली ती आमच्या भावड्या ललितची! जुळून येती रेशीमगाठीला आमची राखी बांधली गेली हातावर, तेव्हा पासून मी त्याला माणूस म्हणून आणि नट म्हणून नेटानं आणि निष्ठेनं काम करताना पाहत आलं आहे. किती ग्रो झाला आहे आपला भावड्या...काय रेंज..."
"चि व चि सौ का ह्या माझी निर्मिती असलेल्या चित्रपटातून तू पदार्पण केलंस...ते आता आरपार मध्ये निर्माता म्हणून आलास...किती मोठी झेप...किती मेहनत...किती समर्पण...देखणं रूपडं तर आहेच पण अभिनया लाजवाब. आरपार मध्ये खिळवून ठेवलं पठ्यानं. ललित तुझं खूप कौतुक अभिमान आणि प्रेम...आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझं स्वागत...निर्माता म्हणून ! Welcome to the club !", असं मधुगंधा कुलकर्णी म्हणाली आहे.
"हृता उत्तम अभिनेत्री आहेच आणि ह्या चित्रपटात दोघांची केमिस्ट्री लाजवाब! थोडा पक्षपात आहेच...भावाचा सिनेमा आहे..अवश्य बघा...लव्ह स्टोरीज कायम वर्क होतात. आरपार भिडणारी ही आजच्या तरुणाईची सुंदर फिल्म. ललित खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या आणि चित्रपटासाठी!", असं मधुगंधानं पुढे म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
'मी नास्तिक झालो ते कोणाच्या प्रभावामुळे...', अभिनेता ललित प्रभाकरचं वक्तव्य चर्चेत