Horoscope Today 14 September 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 14 सप्टेंबर 2025 चा दिवस आहे. म्हणजेच आजचा दिवस रविवार आहे. आजचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे. आजच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करतात. तसेच, प्रदक्षिणा घालतात. आज अनेक ग्रहांचं संक्रमण देखील आहे. त्यानुसार, 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope) :
आजचा दिवस ऊर्जा देणारा आहे. नवीन कामांमध्ये यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आर्थिक स्थितीत थोडी सुधारणा होईल. प्रवासाची संधी येऊ शकते.
उपाय: गोड पदार्थांचे दान करा.
वृषभ रास (Taurus Horoscope) :
आज कामाच्या ठिकाणी संयम ठेवा. थोडीशी अस्वस्थता जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. दुपारनंतर कामात सुधारणा होईल.
उपाय: पांढरी वस्त्रं परिधान करा.
मिथुन रास (Gemini Horoscope) :
तुमचे व्यक्तिमत्त्व आकर्षक भासेल. लोकांचा विश्वास मिळेल. जुने प्रलंबित कामे पूर्ण होतील. मित्रमंडळात वेळ जाईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
उपाय: देवीची पूजा करा.
कर्क रास (Cancer Horoscope) :
घरगुती कामात व्यस्त राहाल. थोडासा मानसिक तणाव जाणवेल, पण संध्याकाळपर्यंत वातावरण बदलून आनंद मिळेल. नोकरीत वरिष्ठांचा सल्ला घ्या.
उपाय: चांदीचा ताबीज जवळ ठेवा.
सिंह रास (Leo Horoscope) :
आर्थिक दृष्टिकोनातून चांगला दिवस आहे. महत्वाचे निर्णय घेण्यासाठी उत्तम वेळ. विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रवासाचा योग आहे. आत्मविश्वास वाढेल.
उपाय: सूर्यदेवाला अर्घ्य द्या.
कन्या रास (Virgo Horoscope) :
आजचा दिवस थोडा खर्चिक आहे. अनावश्यक बोलणे टाळा. आरोग्याच्या लहान समस्या जाणवतील. महत्वाचे काम पुढे ढकलणे चांगले.
उपाय: तुलसीला पाणी अर्पण करा.
तूळ रास (Libra Horoscope) :
संबंध दृढ करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नवे व्यावसायिक संपर्क जुळतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक लाभ होईल.
उपाय: पांढऱ्या फुलांचा सुवास घ्या.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope) :
नोकरीत वरिष्ठांचा सल्ला घ्या. मानसिक स्थैर्य राखा. कौटुंबिक मतभेद दूर होतील. आर्थिक व्यवहार जपून करा.
उपाय: भोवती काळा धागा बांधा.
धनु रास (Sagittarius Horoscope) :
विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षांसाठी दिवस उत्तम आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवासाची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल.
उपाय: विष्णू मंत्र जपा.
मकर रास (Capricorn Horoscope) :
कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. कामाच्या ठिकाणी संयमाने वागा. आर्थिक गोष्टीत जपून व्यवहार करा. दुपारनंतर परिस्थिती सुधारेल.
उपाय: काळ्या उडीदाचे दान करा.
कुंभ रास (Aquarius Horoscope) :
सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जुने मित्र भेटतील. आर्थिक लाभाची शक्यता आहे. व्यवसायात नवा प्रकल्प सुरू होईल.
उपाय: पितळेची वस्तू जवळ ठेवा.
मीन रास (Pisces Horoscope) :
आज आरोग्याची विशेष काळजी घ्या. खर्च वाढू शकतो. मन थोडे अस्थिर राहील. सायंकाळी आनंददायी घटना घडतील.
उपाय: गंगाजल घरात शिंपडा.
- समृद्धी दाऊलकर
हे ही वाचा :