Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या रिअ‍ॅलिटी शोमुळे खूप चर्चेत आहे आणि ती लवकरच Alt Balajiचा ‘लॉक अप’ (Lock Upp) हा रिअ‍ॅलिटी शो होस्ट करणार आहे. एकता कपूरच्या (Ekta Kapoor) या शोची संकल्पना इतर शोपेक्षा वेगळी आहे. या Metverseशोच्या माध्यमातून प्रेक्षकांना गेमिंगचा आनंदही घेता येणार आहे. या शोचे जोरदार प्रमोशन केले जात आहे. नुकताच या शोचा फर्स्ट लूक समोर आला, ज्यामध्ये कंगना तिच्या खास अंदाजात दिसत आहे. कंगना आणि एकता या दोघींनी आपापल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे जाहीर केले की, या शोचा टीझर गुरुवारी 11 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.


कंगना रनौतने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये ती खूपच मस्त अंदाजात दिसत आहे. गोल्डन कलरच्या आउटफिटमध्ये ती एका पुरुषाच्या खांद्यावर पाय ठेवून उभी राहिलेली दिसत आहे. त्याचवेळी तिच्या एका हातात बेड्या देखील दिसत आहेत. हा शो 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.


पाहा पोस्ट :


 







रिपोर्ट्सनुसार, शोमध्ये 13 ते 15 स्पर्धक सहभागी होतील. कंगनाचा लॉकअप हा शो 8 ते 10 आठवडे म्हणजेच सुमारे 2 महिने चालेल, ज्यामध्ये सर्व सहभागींना एका घरात कैद केले जाईल. या घरात अनेक जाचक खेळ होणार असल्याचा दावा कंगनाने केला आहे.


एकताची लाडकी कंगना!


‘टीव्ही क्वीन’ एकता ही एक यशस्वी चित्रपट निर्माती, तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मची मालक आहे. तिच्या ALT बालाजी प्लॅटफॉर्मवर, सर्व प्रकारच्या प्रेक्षकांसाठी सामग्री तयार केली गेली आहे. आता एकताने ओटीटी प्लॅटफॉर्म MX Player सोबत हातमिळवणी केली आहे.


कंगनाची बॉलिवूडमधील मोजक्याच लोकांशी मैत्री आहे. एकता ही त्यापैकीच एक आहे. 'शूटआऊट अ‍ॅट वडाळा' या चित्रपटात दोघींनी पहिल्यांदा एकत्र काम केले. कंगनाने एकताच्या 'जजमेंटल है क्या' चित्रपटातही काम केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही, पण एकता-कंगना यांची मैत्री चांगलीच रंगली. कंगनाचा शेवटचा चित्रपट 'थलायवी' पाहिल्यानंतरही एकताने तिचे तोंडभरून कौतुक केले होते.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha