मुंबई : शेअर बाजारात (Share Market) कधी काय होईल हे सांगता येत नाही. येथे कधी एखादी कंपनी गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स देते. तर एखादी कंपनी गुंतवणूकदारांना फार मोठा तोटा देऊ जाते. दरम्यान, सध्या अफोर्डेबल रोबोटिक अँड ऑटोमेशन नावाच्या या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. ही कंपनी गेल्या चार वर्षांपासून छप्परफाड कमाई करून देत आहे.
विजय केडिया यांची कोट्यवधींची गुंतवणूक
साधारण चार वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरचे मूल्य 42 रुपये होते. आता हाच शेअर 675 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. अफोर्डेबल रोबोटिक अँड ऑटोमेशन या कंपनीने गेल्या चार वर्षांत गुंतवणूकदारांना 1521 टक्के रिटर्न्स दिले आहेत. विशेष म्हणजे या कंपनीची स्थिती लक्षात घेता दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनीदेखील या कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. या कंपनीचे 52 आठवड्यातील सर्वोच्च मूल्य 845.80 रुपये आहे. तर 52 आठवड्यांतील नीचांकी मूल्य 409.50 रुपये आहे.
4 वर्षांत दिले 1521 टक्क्यांनी रिटर्न्स
अफोर्डेबल रोबोटिक अँड ऑटोमेशन या कंपनीच्या शेअरचे मुल्य 13 नोव्हेंबर 2020 रोजी 42.26 रुपये होते. आता 11 नोव्हेंबर 2024 रोजी हा शेअर 677.10 रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीने गेल्या चार वर्षांत गुंतवणूकदारांना 1521 टक्के रिटर्न्स दिले आहेत. गेल्या तीन वर्षांत अफोर्डेबल रोबोटिक अँड ऑटोमेशन या कंपनीच्या शेअरमध्ये 421टक्क्यांची बम्पर तेजी आलेली आहे. इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स क्षेत्रात काम करमाऱ्या या कंपनीचा शेअर गेल्या तीन वर्षांत 131.37 रुपयांहून 675 रुपयांवर पोहोचलेला आहे.
2 दोन वर्षांत 350 टक्क्यांनी तेजी
अफोर्डेबल रोबोटिक अँड ऑटोमेशन या कंपनीने गेल्या दोन वर्षांतही चांगली कामगिरी केलेली आहे. दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरमध्ये 350 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. 11 नोव्हेंबर 2022 रोजी हा शेअर 152.21 रुपयांवर होता. 11 नोव्हेंबर 2024 रोजी हा शेअर 677.10 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आठ महिन्यांचा विचार करायचा झाल्यास हा शेअर या काळात 65 टक्क्यांनी वाढला आहे. तर या वर्षभरात हा शेअर 33 टक्क्यांनी तेजीत आहे.
विजय केडिया यांनी केलीय कोट्यवधींची गुंतवणूक
दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांच्याकडे या कंपनीचे तब्बल 11 लाखपेक्षा अधिक शेअर्स आहेत. या शेअर्सची एकूण संख्या 11,16,720 एवढी आहे. त्यांची या कंपनीत 9.93 टक्के मालकी आहे. वर नमूद केलेली माहिती ही सप्टेंबर 2024 पर्यंतची आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)