Kunya Rajachi Ga Tu Rani : अवघ्या काही महिन्यांतच स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील कुन्या राजाची गं तु राणी (Kunya Rajachi Ga Tu Rani) या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. शनिवार 16 मार्च रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रक्षेपित करण्यात आला. दरम्यान यानंतर मालिकेतील कबीर आणि गुंजा म्हणजेच अभिनेता हर्षद अटकरी (Harshad Atkari) आणि शर्वरी जोग (Sharvari Jog) या दोघांनीही एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यावर प्रेक्षकांनी देखील कमेंट्स करत तुम्हाला मिस करणार असल्याच्या भावना व्यक्त केल्यात.
तसेच स्टार प्रवाह वाहिनीने देखील ही मालिकेचा प्रवास संपत असल्याचं म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे. मालिकेच्या शेवटच्या भागामध्ये गुंजा आणि कबीरचं लग्न होत असल्याचं दाखवण्यात येतं. पण यावेळी गुंजावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यावेळी कबीर तो हल्ला होण्यापासून गुंजाला वाचवतो आणि कबीर-गुंजाचं लग्न होतं. मालिकेचा हा गोड शेवट प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडल्याचं पाहायला मिळतंय.
'तुमच्या मनात राजासारखं स्थान दिलंत'
स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘कुन्या राजाची गं तू रानी’ या मालिकेचा प्रवास आज एका गोड वळणावर येऊन संपत आहे. पण तुम्ही कायमच आम्हाला तुमच्या मनात राजासारखं स्थान दिलंत म्हणूनच तुमचं प्रेम आम्ही राणीसारखं मिरवलं. या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!! त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!! आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..! त्याप्रमाणे हर्षद आणि शर्वरी या दोघांनाही पोस्ट शेअर करत Will Miss you Kabir and Gunja असं म्हटलं आहे.
स्टार प्रवाहवर सुरु होणार साधी माणसं मालिका
स्टार प्रवाह वाहिनीवर घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं या दोन नव्या मालिका सुरु होणार आहेत. साधी माणसं ही मालिका 18 मार्चपासून सुरु होणार आहे. तसेच संध्याकाळी 7 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या मालिकेत अभिनेता शिवानी बावकर आणि आकाश नलावडे ये दोन कलाकार झळकरणार आहेत. तसेच अभिनेत्री सुप्रिया पाठारे या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.