Ajit Pawar On Supriya Sule :  काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अवधूत गुप्तेच्या (Avdhoot Gupte) खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात हजेरी लावली होती. महाराष्ट्रात राजकारणात झालेल्या बंडानंतर आणि पवार कुटुंबात पडलेल्या राजकीय फुटीनंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात व्यक्त झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना दादा आणि कुटुंबासोबतचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला. तो व्हिडिओ पाहून सुप्रिया सुळे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तोच व्हिडिओ अजित पवारांना (Ajit Pawar) झी चित्र गौरव सोहळ्यात दाखवण्यात आला. 


नुकत्याच पार पडलेल्या झी चित्र गौरव सोहळ्यात अवधूत गुप्तने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलाखत घेतली. यावेळी अजित पवारांच्या उत्तरांनी साऱ्यांचंच लक्ष वेधलं. यावेळी अजित पवारांना सुप्रिया सुळेंचा तो भावूक व्हिडिओ देखील दाखवण्यात आला. त्यावरही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


आमच्या घरात प्रत्येकाला राजकीय स्वातंत्र्य - अजित पवार


या व्हिडिओ दाखवल्यानंतर अजित पवार यांनी त्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी म्हटलं की, आज माझी राजकीय भूमिका वेगळी आहे. पण, प्रत्येकाची राजकीय भूमिका आणि घरगुती नातेसंबंध वेगळे असतात. तुम्ही पहिल्यापासून आमच्या घरात पाहिलंत, तर आमचं संपूर्ण घराणं हे शेतकरी कामगार पक्षाचं होतं. त्यावेळी आमचे स्वर्गीय वसंतदादा पवार त्या पक्षाचे लीडर होते आणि त्यांना तिकीट सुद्धा मिळालं होतं. संपूर्ण घर शेतकरी कामगार पक्षाचं काम करत असताना पवार साहेब फक्त काँग्रेसचं काम करत होते. कारण, त्यांना ती विचारधारा पटलेली होती. त्यामुळे आमच्या घरात प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आणि राजकीय स्वातंत्र्य आहे.


आता खूप पाणी वाहून गेलंय - अजित पवार


पुढे बोलताना अजित पवारांनी म्हटलं की, मी इतकी वर्ष वडिलाधाऱ्यांचा आदर करत आलोय, इथून पुढेही करेनच आणि तिच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. आम्ही काही वेगळं केलंय अशातला भाग नाही. अनेकांनी आम्हाला म्हटलं की, तुम्ही भाजपसोबत कसे जाऊ शकता त्यांना मी एवढंच म्हणेन की कधीकाळी आम्ही शिवसेनेसोबत देखील गेलो होतो. पण आता मागच्या आठवणी या वेगवेगळ्या आणि त्या-त्या काळातल्या आहेत. पण आताचा काळ पूर्ण बदललाय. आता खूप पाणी वाहून गेलंय. बरेच जण निर्ढावलेले आहेत. 






ही बातमी वाचा : 


Ashok Saraf Exclusive : अशोक सराफ लोकसभा निवडणूक लढवणार? मामा म्हणाले,"राजकारणं करणं मला..."