Kunal Kamra Triggers Row Sings Song: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं (Kunal Kamra) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर एक कविता सादर केली. पण, याच कवितेनंतर शिवसैनिक संतापानं लालबुंद झाले आणि थेट कुणाल कामराचा ज्या स्टुडिओमध्ये शो पार पडला थेट त्याची तोडफोड करायला पोहोचले. काही शिवसेनेच्या नेत्यांनी, आमदार, खादसारांनी थेट कुणाल कामराला धमक्या देण्यास सुरुवात केली. एवढंच नाहीतर कुणाल कामरासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विशेषतः संजय राऊतही (Sanjay Raut) शिंदेंच्या शिवसैनिकांच्या निशाण्यावर आले. पण, नेमकं कुणाल कामरानं कोणती कविता गायली? कुणाल कामराच्या शोमध्ये काय घडलं? त्यानं कोणत्या मुद्द्याला हात घातला? एकनाथ शिंदेंवर त्यानं अशी काय टीका केली? शिवसैनिकांचा उद्रेक होण्यामागे कारण नेमकं आहे तरी काय? हे सविस्तर जाणून घेऊयात... 

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भर कार्यक्रमात एक कविता सादर केली. त्याच्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामरा यांनं जी कविता सादरर केली, त्याचा व्हिडीओ थेट ट्वीट केला आहे. संजय राऊतांच्या ट्वीटनंतर शिवसैनिकांच्या उद्रेक शिगेला पोहोचला. संजय राऊत म्हणाले की, कुणाल अद्भूत आहे! जय महाराष्ट्र! कुणालनं तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या घटनाक्रमावर टीप्पणी करताना एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे, शिंदे यांना देशद्रोही म्हणणाऱ्या कुणाल कामराच्या मुंबईतील स्टुडिओमध्ये संतप्त शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. एकनाथ शिंदेंव्यतिरिक्त कुणाल कामरा यांनं पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनाही चुकीच्या पद्धतीनं लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईतील खार पोलीस ठाण्यात कुणालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कुणाल कामराविरोधात शिवसैनिक एवढे आक्रमक, त्यानं नेमकं केलंय काय?

कुणाल कामरानं त्याच्या खारमधल्या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर विडंम्बनात्मक काव्य सादर केलं. ही कविता साधारणतः तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या राजकीय भूकंपावर आधारीत असल्याचं संजय राऊतांनी ट्वीट केलं. हे सर्व प्रकरण शिवसैनिकांना भलतंच झोंबलं आणि त्यावरुन राज्याच्या राजकारणात गदारोळ सुरू झाला. कुणाल कामरा नेमकं म्हणाला काय? सविस्तर पाहुयात... 

कुणाल कामरा यांनं आपल्या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये म्हटलं की, शिवसेना भाजपमधून बाहेर पडली. मग शिवसेनेतून शिवसेना बाहेर पडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादी उदयास आली. एका मतदाराला 9 बटणं देण्यात आली. सगळे गोंधळले होते. पार्टी एका व्यक्तीनं सुरू केली होती. ती व्यक्ती ठाण्यातून येते, जो मुंबईतला एक सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. त्यानंतर कुणालनं आपलं विडंम्बनात्मक काव्य सादर केली.  

कुणाल कामरानं काय कविता गायली? 

"ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये... ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये... 

एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छिप जाये...मेरी नज़र से तुम देखो, गद्दार नज़र वो आए...

ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये... मंत्री नहीं वो दलबदलू है, और कहा क्या जाये...?जिस थाली में खाए, उसमें ही वो छेद कर जाए...मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए... तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहे... 

ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये..."

पुढे बोलताना कुणाल कामरा म्हणाला की, "ये उनकी राजनीति है। वे पारिवारिक कलह को खत्म करना चाहते थे। उन्होंने किसी के पिता को चुरा लिया। इसका क्या जवाब होगा? क्या मैं कल तेंदुलकर के बेटे से मिलूं, भाई, चलो डिनर करते हैं। मैं तेंदुलकर की प्रशंसा करता हूं और उनसे कहता हूं, भाई, आज से वे मेरे पिता हैं।"

कुणाल कामराचं वक्तव्य शिवसेनेच्या आमदार, खासदारांना झोंबलं

कुणाल कामराच्या कवितेमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. कामराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते मुंबई खामधील हॉटेल युनिकॉन्टिनेंटलमध्ये पोहोचले आणि तोडफोड केली. कामरा यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी त्यांनी केली. एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ समोर येताच पक्षाचे कार्यकर्ते हॉटेलच्या स्टुडिओत गेले आणि त्यांनी गोंधळ घातला. तसेच, मोठ्या प्रमाणावर तोडफोडही केली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

PHOTO : एकनाथ शिंदेंवर टीका करणे महागात, कुणाल कामराचा शो झाला तो स्टुडिओ शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी फोडला