PHOTO : एकनाथ शिंदेंवर टीका करणे महागात, कुणाल कामराचा शो झाला तो स्टुडिओ शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी फोडला
कुणाल कामराने ज्या ठिकाणी कॉमेडी शो केला होता तो स्टुडिओ शिंदेंच्या शिवसैनिकांनी फोडला.
कुणाल कामराने ज्या ठिकाणी कॉमेडी शो केला होता तो स्टुडिओ शिंदेंच्या शिवसैनिकांनी फोडला आहे.
1/8
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने स्टँड अप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केलं असून एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली आहे.
2/8
कुणाल कामराने एका व्यंगात्मक गाण्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत त्यांना गद्दार म्हटलं.
3/8
त्यामुळे कुणाल कामराच्या विरोधात शिंदेंचे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं दिसून आलं.
4/8
मुंबईतील खारमध्ये ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामराचा कॉमेडी शो झाला तिथे शिंदेच्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.
5/8
शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल कनाल आणि कुणाल सरमळकर यांनी स्टुडिओमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत जाऊन तोडफोड केली.
6/8
शिवसैनिकांनी या स्टुडिओची तोडफोड करून कुणाल कामराचा निषेध व्यक्त केला.
7/8
कुणाल कामराच्या विरोधात शिंदेंचे आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
8/8
कुणाल कामराने शिंदेंची माफी मागावी अन्यथा त्याला फिरू दिले जाणार नसल्याचा इशारा खासदार नरेश मस्के यांनी दिला.
Published at : 23 Mar 2025 11:11 PM (IST)