Kristen Stewart Marriage With Girlfriend: 'ट्वाइलाईट' (Twilight) सीरिजमधून प्रसिद्धीझोतात आलेली हॉलिवूड अभिनेत्री क्रिस्टन स्टीवर्टनं (Kristen Stewart) आपली लग्नगाठ बांधली आहे. तिनं आपली गर्लफ्रेंड Dylan Meyer ला आपल्या आयुष्यभराची जोडीदार म्हणून निवडलं आहे. दोघीही तब्बल सहा वर्षांपासून एकमेकींना डेट करत होत्या. अशातच अचानक दोघींच्या लग्नाचे फोटो समोर आल्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, क्रिस्टन स्टीवर्टनं काही वर्षांपूर्वी आपण लेस्बियन असल्याचं स्वतः जाहीर केलं होतं. अद्याप दोघींच्या टीमनं याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.  

सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर Kristen Stewart आणि स्क्रिन रायटर डायलन मेयर यांनी एकमेकींसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. 'ट्वाइलाईट' स्टारनं लॉस एन्जिलोसमध्ये एका खासगी समारोहात आपल्या लॉन्ग टाईम गर्लफ्रेंडसोबत आयुष्यभराचं नातं जोडलं. साधारणतः तीन वर्षांपूर्वी Dylan Meyer सोबत लग्नगाठ बांधली होती.                       

क्रिस्टन आणि डायलन यांच्या लग्नाचे फोटो

लॉस एंजिल्समधील घरात पार पडला लग्नसोहळा 

TMZ च्या वृत्तानुसार, 35 वर्षीय क्रिस्टन स्टीवर्ट आणि 37 वर्षीय डायलन मेयर यांनी 20 एप्रिल 2025 रोजी ईस्टर संडे रोजी त्यांच्या लॉस एंजेलिसच्या घरी लग्न केलं. यावेळी दोघींच्याही जवळचे नातेवाईक उपस्थित होते. पोर्टलनं लग्नाचे फोटो पब्लिश केले आहेत.

क्रिस्टन आणि डायलन यांनी मॅरेज लायसन्स मिळाल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न समारंभात त्यांनी अभिनेत्री अ‍ॅशले बेन्सनसह मित्रमंडळी आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत एकमेकांना 'हो' म्हटलं आणि आयुष्यभरासाठी नातं जोडलं. 

2021 मध्ये पार पडलेला साखरपुडा 

दरम्यान, क्रिस्टन आणि डायलन यांची भेट एका फिल्मच्या सेटवर झाली होती. ऑगस्त 2019 मध्ये दोघीही एकमेकींना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. त्यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये दोघींनी इन्स्टाग्रामवर आपल्या नात्याबाबत जाहीर कबुली दिली. त्यानंतर दोघींनीही आपल्या नात्यात एक पाऊल पुढे टाकत साखरपुडा उरकला होता. क्रिस्टननं सांगितलं होतं की, डायलननं तिला प्रपोज केलं होतं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Abhinav Shukla Gets Death Threat: 'सलमानसारखाच तुझ्याही घरी येऊन तुला AK 47नं गोळ्या घालेन...'; प्रसिद्ध अभिनेत्याला बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी