Kranti Redkar On Chabil Godo Birth Story: मराठीतली लोकप्रिय अभिनेत्री (Marathi Actress) क्रांती रेडकर (Kranti Redkar) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. क्रांती रेडकर (Marathi ActressKranti Redkar) आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतेच, पण त्यासोबतच ती तिच्या दोन चिमुकल्या मुली छबिल आणि गोदो यांचे काही खट्याळ किस्सेही चाहत्यांसोबत शेअर करायची. पण, क्रांतीनं कधीच त्या दोघींचे चेहरे दाखवले नव्हते. अखेर एका लग्नसोहळ्याला क्रांती आणि तिचे पती समीर वानखेडे यांनी हजेरी लावलेली. त्यावेळी क्रांती रेडकरसोबत तिच्या दोन्ही लेकीसुद्धा होत्या. त्यावेळी त्या लग्नसोहळ्यातून छबिल आणि गोदोचे चेहरे रिविल करण्यात आलेले. 

Continues below advertisement

क्रांतीने बऱ्याच वेळा मुलींचे चेहरे न दाखवता त्यांचे व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामुळे क्रांतीच्या या जुळ्या मुली कशा दिसतात? हे पाहण्याची इच्छा अनेक दिवसांपासून चाहत्यांना होती. अखेर त्या लग्नसोहळ्यातील व्हायरल रिल्समुळे क्रांतीच्या लेकींना सर्वांनी पाहिलं. पण, त्यानंतर क्रांतीनं स्वतःच्या अकाउंटवरुन एक रिल शेअर करुन स्वतःच मुलींचे चेहरे रिविल केलेले. अशातच आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत क्रांती रेडकरनं छबिल आणि गोदोच्या जन्मावेळीचा किस्सा शेअर केला आहे. त्यावेळी जुळी मुलं होणार याबाबत क्रांतीला जराशीही कल्पना नव्हती, त्यानंतर मात्र ज्यावेळी तिला जुळं होणार असल्याचं कळालं, त्यावेळी तिच्या पायाखालची जमीन हादरली होती, अशी माहिती क्रांती रेडकरनं दिलेली.   

क्रांती रेडकर नेमकं काय म्हणाली? (Marathi Actress Kranti Redkar)

क्रांती म्हणाली, "मी जेव्हा पहिल्या सोनोग्राफीला गेले, तेव्हा एवढंच कळलं होतं की, मी प्रेग्नंट आहे... पहिल्या सोनोग्राफीला गेल्यावर ज्या डॉक्टर होत्या, त्या पोटावरुन काहीतरी यंत्र फिरवत होत्या. त्यावेळी डॉक्टर म्हणाल्या, सर्व ठीक वाटतंय... नंतर डॉक्टरांनी मला बघायला सांगितलं आणि म्हणाल्या, बेबी नंबर 1 ठीक आहे... आणि बेबी नंबर 2 दोघेही ठीक आहेत. हे ऐकताच बेबी नंबर 1, 2 हे काय आहे? मला ट्विन्स होणार आहेत का? असं मी डॉक्टरांना विचारलं... मग त्यांनी अगदी थंडपणे माझ्या म्हणण्याला होकार दिला. डॉक्टर शांत होत्या, पण माझ्या पायाखालची जमीन जवळपास हलली होती...", असं क्रांती रेडकर म्हणाली.

दरम्यान, क्रांती रेडकरच्या मुलींची नावं जीया आणि जायदा अशी आहेत. पण ती त्यांना प्रेमाने छबील व गोदो असे म्हणते. क्रांतीनं ज्यावेळी छबिल, गोदोचे चेहरे रिविल केलेले, त्यावेळी त्या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी हॉर्ट इमोजी देत रिअॅक्ट केलेलं. तर, क्रांतीच्या दोन्ही मुलींचं कौतुकही केलेलं. अनेकांनी दोन्ही मुली क्रांती सारख्या दिसत असल्याचं म्हटलेलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Kranti Redkar: परिस्थिती हाताबाहेर गेली, पण आता ..; क्रांती रेडकरनं शेअर केले छबिल- गोदोचे चेहेरे , नंतर म्हणाली...