मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांचे (Leopard Attack) प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं चित्र आहे, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांमध्ये लोकवस्तीत देखील बिबट्याचे दर्शन झाल्याचे, बिबट्याचा वावर असल्याचे व्हिडीओ समोर आले होते. अशातत आज मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मीरा-भाईंदरमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. मीरा-भाईंदरमधील (Mira Bhayandar Leopard Attack) तलाव रोड परिसरातील एका इमारतीमध्ये बिबच्या शिरला असून त्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 3 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्या बिबट्याा जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बिबट्याच्या  (Mira Bhayandar Leopard Attack) हल्ल्यात एकाच कुटुंबातील तिघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची देखील माहिती समोर आली आहे.आजूबाजूच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे.(Leopard Attack) 

Continues below advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी मीरा-भाईंदरच्या तलाव रोड परिसरातील पारिजात नावाच्या बिल्डींगमध्ये हा बिबट्या शिरला. त्या इमारतीच्या आवारात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आलं. मीरा-भाईंदरच्या बीपी रोड मागच्या तलावरोड परिसरातील साईबाबा हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या पारिजात इमारतीत आज सकाळी 8 च्या सुमारास हा बिबट्या दिसला. तेथील एका घरात हा बिबट्या थेट घुसला, तेव्हा घरात 4 माणसं होती. तिथे घरात 25 वर्षांची एक तरूणी आणि काही पुरूष होते.  त्या घरात शिरलेल्या बिबट्याने सर्वांवर हल्ला चढवला. त्यांचे आवाज, आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांना ही घटना समजली. (Mira Bhayandar Leopard Attack)

परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना व अग्निशमन दलाला फोन करून बिबट्या शिरल्याची, त्याच्या हल्ल्याची माहिती दिली.  त्यानंतर पोलीस व अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या हल्ल्यात तिघे जखमी झाले होते, त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. या हल्ल्यात 25 वर्षांची तरूणी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तिच्यावर साईबाब हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी येण्यास निघाले आहेत. मात्र घटनास्थली नागरिकांची, बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. अग्निशमन दलाचे जवान तसेच पोलीस घटनास्थळी असून  त्या बिबट्याला एका रूममध्ये बंद करून ठेवण्यात आलं असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी बिबट्याचा वावर आढळल्याने परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

Continues below advertisement

Pune Leopard Attack: पुण्यातील केशवनगरमध्ये बिबट्याचा वावर

 ‘कोणार्क रिवा’ आणि ‘एल्कोन सिल्व्हर लीफ’ सोसायटीच्या पार्किंग परिसरात बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. माहिती मिळताच वन विभाग व बचाव पथकाने तपासणी सुरू केली. बिबट्या सापडला नसला, तरी पाण्याच्या टाकीजवळ त्याचे पायांचे ठसे आढळले. नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.