Kolkata Model Puja Sarkar Suicide : कोलकाता  (Kolkata) चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मॉडेल आणि अभिनेत्री यांच्या आत्महत्येंच्या प्रकरणांमुळे खळबळ माजली आहे.  मे महिन्यामध्ये जवळपास चार अभिनेत्रींनी आत्महत्या केली. या अभिनेत्रींच्या आत्महत्येमागे नक्की काय कारण आहे? तसेच बंगाली चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्रींच्या आत्महत्येचे प्रमाण सध्या वाढत का आहे? असे अनेक प्रश्न सध्या अनेकांना पडले आहेत. आता दक्षिण कोलकाता (Kolkata) येथील बांसद्रोणी भागामध्ये राहणाऱ्या पूजा सरकार (Puja Sarkar) नावाच्या मॉडेलनं आत्महत्या केली आहे. 


काय आहे प्रकरण?  
मॉडेल आणि स्टूडेंट असणाऱ्या  21 वर्षाच्या पूजा सरकारचा मृतदेह रविवारी (17 जुलै) तिच्या घरात अढळला. पूजानं सहा महिन्यांपूर्वी बांसद्रोणी येथे हा फ्लॅट भाड्याने घेतला होता. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (16 जुलै) एका मैत्रिणीला भेटण्यासाठी पूजा एका हॉटेलमध्ये गेली. त्यानंतर ती घरी आली. पण अचानक तिनं स्वत:ला खोलीमध्ये कोंडून घेतलं. त्यानंतर तिच्या घरातून बराच वेळ आवज आला नाही. तेथील स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पूजाच्या घराचा दरवाजा उघडला. पोलिसांना पूजाचा मृतदेह पंख्याला लटकलेला अढळला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच संपूर्ण प्रकरण समजेल.  


गेल्या काही महिन्यांपासून कोलकातामधील अभिनेत्री आणि मॉडेलच्या आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. मे महिन्यामध्ये पंधरा दिवसाच्या आत चार अभिनेत्री आणि मॉडेल्सनं आत्महत्या केली. बिदिशा डे मजुमदार, पल्लवी डे, मंजुषा नियोगी आणि सरस्वती दास या कोलकाता येथील मॉडेल आणि अभिनेत्रींनी आत्महत्या केली आहे. अभिनेत्री आणि मॉडेल्सच्या आत्महत्येनंतर बंगाली चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ माजली होती. आता पूजा सरकारच्या आत्महत्येमुळे अनेकांना धक्का बसला आहे. 


हेही वाचा: