Sangli Crime Update : पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील जंडीयाला येथील सागर ज्वेलर्स या दुकानातून लाखो रुपयांच्या चोरीचं सांगली कनेक्शन उघड झाले आहे. तिथून चोरीस गेलेल्या सोन्यापैकी 815 ग्रॅम वजनाचे सुमारे 40 लाख रूपये किंमतीचे सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी विठ्ठल कृष्णा कदम यास पोलीसांनी अटक केली आहे. कवठे महांकाळ पोलीस आणि पंजाब पोलिसांनी ही कारवाई केली आहे.


वी ओ-:  जानेवारी महिन्यात अमृतसर जिल्ह्यातील जंडीयाला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सागर कुमार यांच्या मालकीच्या सागर ज्वेलर्स या दुकानातून दुकानातील कामगार अनिकेत विठ्ठल कदम याने सोने चोरून आणले होते. सुमारे अडीच किलो सोने चोरीस गेल्याची फिर्याद दुकानदार सागर कुमार पंजाब पोलिसात केली होती. सागर ज्वेलर्स या दुकानात लांडगेवाडी येथील अनिकेत कदम हा सात आठ वर्षांपासून कामाला होता. मालकांचा पूर्ण विश्वास अनिकेतवर होता. 


दुकानाची किल्ली अनिकेत कदम या कामगाराकडे होती. 13 जानेवारी रोजी रात्री अनिकेत कदम याने दुकानातील सोन्याच्या दागिण्याची चोरी केली. त्याची गलाई करून सुमारे अडीच किलो सोन्याची चोरी करून पसार झाल्याचे ज्वेलर्सच्या मालकाने सांगितले. चोरी झाल्यापासून अनिकेत कदम हा फरारी होता. मुख्य आरोपीच्या शोधात पोलिस होते. शनिवारी सकाळी जंडीयाला पोलिस ठाण्याचे सिनीयर इन्स्पेक्टर दविंदर सिंह तपासकामी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात उपस्थित झाले. 


कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या डी.बी.पथकाने आज धाडसी कारवाई करून आरोपीचे वडील विठ्ठल कदम यास ताब्यात घेतलं. त्याला पोलीसी खाक्या दाखविला असता त्याने 815 ग्रॅम वजनाच्या आणि सुमारे 40 लाख रूपये किंमतीचे सोने पोलिसांच्या ताब्यात दिले. या चोरी प्रकरणातील मुख्य संशयित अद्याप पसार आहे.


सदरची कारवाई पंजाब पोलीस आणि कवठेमंकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी करे ,सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर गोडे,डी.बी.पथकाचे पोलिस नाईक अमिरशा फकीर,पोलीस नाईक संजय कराळे,पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण, पोलीस शिपाई दिपक पवार यांच्या पथकाने केली.