KL Rahul and Athiya Shetty car collection: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आथिया शेट्टी (Athiya Shetty ) आणि भारताचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते. आथिया केएल राहुलसोबते फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करते. दोघांना अनेक ठिकाणी स्पॉटही करण्यात आलं होतं. आथियाच्या बर्थडेला राहुलनं तिच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावेळी राहुलने फोटोला, ‘Happy birthday my ❤’ असं कॅप्शन देत अथियासोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या दोघांच्या सोशल मीडियावरील फोटोंना नेटकऱ्यांची नेहमी पसंती मिळते. एका जाहीरातीदरम्यान राहुल आणि आथिया यांची भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. लंडन येथे त्यांना एकत्र पाहिलं गेलं. त्या दोघांकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. जाणून घेऊयात त्याच्या कार कलेक्शनबाबत....
केएल राहुलकडे मर्सिडीज सी43 एएमजी सेडान ही लग्झरी गाडी आहे. रिपोर्टनुसार, या गाडीची किंमत 75 लाख रुपये आहे. या गाडीमध्ये V6 इंजन आहे. काही दिवसांपूर्वी राहुलनं KLR नंबर प्लेट असणाऱ्या BMW SUV गाडीचा देखील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
आथियाचे कार कलेक्शन :
आथियाकडे Mercedes Benz S-Class आणि BMW X5 या गाड्या आहेत. Ford EcoSport ही लग्झरी गाडी देखील तिच्याकडे आहे. एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आथियाने तिची Ford EcoSport ही पर्सनल कार आणली होती.
अथिया बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी आहे. आथियाने 2015 मध्ये अॅक्शन फिल्म 'हिरो'मधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली होती. चित्रपटात आथियासोबतच अभिनेता सूरज पांचोलीने प्रमुख भूमिका साकारली होती. ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये आथियाने महत्वाची भूमिका साकारली.
Patralekhaa Mangalsutra : पत्रलेखा - राजकुमारचा एअरपोर्ट लूक; पत्रलेखाच्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष