Kiran Mane : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारलेला छावा (Chhaava) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले. अजूनही हा चित्रपट सिनेमागृहात चालू आहे. या चित्रपटाची कथा, कलाकारांनी केलेलं काम सर्वांनाच आवडलं आहे. याच चित्रपटात मराठमोळा कलाकार संतोष जुवेकर याने रायाजीची भूमिका केली होती. याज जुवेकरने केलेल्या विधानानंतर चांगलाच गजहब उडाला होता. त्यानंतर आता अभिनेते किरण माने यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. 

किरण माने यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय?

 किरण माने यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 'रावरंभा' या चित्रपटातील एका क्षणावर भाष्य केलं आहे. सोबतच या पोस्टसोबत त्यांनी एक फोटोही दिला आहे. "मी 'रावरंभा' नावाच्या सिनेमात 'हकीमचाचा' ही छत्रपती शिवरायांशी एकनिष्ठ असलेल्या मुस्लीम गुप्तहेराची भूमिका केली होती. त्या सिनेमामध्ये संतोष जुवेकर हा मुघल बादशहांना राजांच्या खबरी देणार्‍या गद्दार मावळ्याच्या भूमिकेत होता. त्या सिनेमात मी त्याला रंगेहाथ पकडतो तो क्षण! सहज एक आठवण," असं किरण माने यांनी म्हटलंय. 

संतोष जुवेकर नेमकं काय म्हणाला?

किरण माने यांनी  ही पोस्ट सहज एक आठवण असल्याचं म्हटलं आहे. पण त्यांच्या या पोस्टला संतोष जुवेकरने काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानाशी जोडले जात आहे. संतोष जुवेकरने छावा चित्रपटात रायाजीची भूमिका केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाईंच्या निधनानंतर ज्या धाराऊनं त्यांना दूध पाजलं, तिच्या मुलाचे नाव रायाजी असे आहे. पुढे रायाजी हे संभाजी महाराजांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू मित्र झाले. जुवेकरने हे पात्र साकारल्यानंतर  एका मुलाखतीत "आम्ही जेजे मुघल होते, जेजे मुघलांची पात्र करत होते...  ते कलाकारच आहेत, पण माहीत नाही... मी त्यांच्याशी नाही बोललो. संपूर्ण सिनेमाभर मुघलांमधल्या कोणत्याही पात्राशी मी बोललो नाही," असं विधान केलं होतं. या विधानानंतर जुवेकर याच्यावर अनेकांनी टीका केली होती.

हेही वाचा :

युझवेंद्र चहलसोबत बसली अन् क्षणात व्हायरल, भारतासाठी ठरली 'गुडलक गर्ल', 'ती' सुंदर तरुणी नेमकी कोण?

इकडे युझवेंद्र चहलसोबत आरजे माहवश झळकली, तिकडे धनश्री वर्मा पुन्हा चर्चेत; दोघींपैकी श्रीमंत कोण? कोणाकडे किती संपत्ती?

Follower Marathi Movie: सीमाभागाची पार्श्वभूमी अन् 3 मित्रांची रंजक कथा; एका कट्टर पत्रकाराच्या विचारधारेची कहाणी सांगणाऱ्या 'फॉलोअर'चा ट्रेलर रिलीज