युझवेंद्र चहलसोबत बसली अन् क्षणात व्हायरल, भारतासाठी ठरली 'गुडलक गर्ल', 'ती' सुंदर तरुणी नेमकी कोण?
IND Vs NZ Final Match Viral Girl : भारत आणि न्युझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यादरम्यान, व्हायरल झालेली तरुणी नेमकी कोण आहे? असे विचारले जात आहे.
ind vs nz viral girl rj mahvash
1/11
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताने न्युझीलंड संघाला पराभूत करून या स्पर्धेच्या चषकावर आपलं नाव कोरलं.
2/11
रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संघाने चांगली कामगिरी करून दाखवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचं हे स्वप्न शेवटी पूर्ण झालं. या कामगिरीमुळे भारतभरातून टीम इंडियाचं भरभरून अभिनंदन केलं जात आहे.
3/11
दरम्यान, हा सामना चालू असताना झळकलेल्या एका मिस्ट्री गर्लची सध्या देशभरात चर्चा होत आहे.
4/11
विशेष म्हणजे ही मिस्ट्री गर्ल थेट भारतीय क्रिकेटर युझवेंद्र चहलच्या बाजूला बसलेली दिसल्यामुळे तर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
5/11
एकीकडे युझवेंद्र आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा चालू असताना दुसीरकडे युझवेंद्र चहलच्या शेजारीच ही तरुणी बललेली दिसल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.
6/11
विशेष म्हणजे याच मिस्ट्री गर्लला आता भारतासाठी 'गुडलक गर्ल'असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच ही तरुणी नेमकी कोण आहे, असे विचारले जातेय.
7/11
या तरुणीचे नाव माहवश आहे आहे. इन्स्टाग्रामवर तिने तिचे नाव आरजे माहवश आहे लिहिले आहे. ती एक आरजे, चित्रपट निर्माती, अभिनेत्री असल्याचं तिने तिच्या इन्स्टाग्रामच्या बायकोमध्ये म्हटलंय.
8/11
इन्स्टाग्रामवर तिला 18 लाख लोक फॉलो करतात. ती सोशल मीडियावर विनोदी व्हिडीओ तयार करते.
9/11
तिने अलिगढ येथील अलिगढ मुस्लीम विद्यापीठातून शिक्षण घेतलेले आहे.
10/11
त्यानंतर दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातूनही तिने कम्यूनिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले आहे.
11/11
युझवेंद्र चहल आणि व्हायरल झालेली मिस्ट्री गर्ल
Published at : 10 Mar 2025 05:09 PM (IST)