King Of Kotha Release Date : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील बहुप्रतिक्षित 'किंग ऑफ कोठा' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात साऊथचा सुपरस्टार दुलकर सलमान गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांनी या सिनेमाच्या दुसऱ्या लुकचे पोस्टर जारी केले आहे. याशिवाय सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार आहे याची तारीख देखील जाहीर केली आहे. या सिनेमातील सलमानचा लुक जबरदस्त असणार आहे. चाहत्यांना हा लुक खूपच आवडला आहे. निर्मात्यांनी लुकचे पोस्टर जारी केल्यानंतर चाहत्यांनी तो सोशल मीडियावर शेअर करत सलमानच्या लुकवर कौतुकाचा वर्षाव केलाय. 


साऊथ फिल्म इंडस्ट्रीत दुलकर सलमाला स्टाईल रोमांस आणि अॅक्शनसाठी ओळखले जाते. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सिनेमाच्या दुसऱ्या लुकमध्ये दुलकर सलमान अॅंग्री यंग मॅन दिसत आहे. निर्मात्याने ट्वीटरवरून सलमानचा लुक शेअर केलाय. यामध्ये सलमान एका कारमसोर अॅंग्री यंग मॅन बनून उभा असल्याचे दिसत आहे. विंटेज पार्श्वभूमी, रेट्रो आउटफिट्स आणि गँगस्टर अवतारात सलमानचा लुक जबरदस्त दिसत आहे. 






 


'किंग ऑफ कोठा' कधी होणार प्रदर्शित?


सिनेमाच्या दुसऱ्या लुक पोटर्ससोबत निर्मात्याने सिनेमा प्रदर्शित होण्याची तारीख देखील अधिकृतरित्या जाहीर केली आहे. हा सिनेमा ओणम फेस्टिवलच्या मोक्यावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. "तयार रहा, तुमच्यासाठी घेऊन येत आहोत विलक्षण आनंदाची पर्वणी. #KingOfKotha ओणम 2023 पासून चित्रपट गृहांमध्ये एक शक्तिशाली, अॅक्शन पॅक अनुभव देण्यासाठी सज्ज आहे." असे ट्वीट निर्मात्याने केले आहे. 


दुलकर सलमानने गेल्या 11 वर्षांपासून साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आगामी किंग ऑफ कोठा हा सिनेमा त्याच्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. प्रेषकांना माहिती देण्यासाठी निर्मात्याने एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये फिल्म इंडस्ट्रीतील सलमानच्या प्रवासाची एक झलक दिसत आहे.  


किंग ऑफ कोठामध्ये अनोख्या भूमिकेत दिसणार दुलकर सलमान


किंग ऑफ कोठामध्ये दुलकर सलमान हा अनोख्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात तो एका गॅंगस्टरची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा एक गॅंगस्टर ड्रामा असल्याचे म्हटले जात आहे. सलमानच्या चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे. बहुप्रतिक्षित किंग ऑफ कोठाचे दिग्दर्शन अभिलाष जोशी याने केले आहे. अभिनेत्री ऐश्वर्या लक्ष्मी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा मल्याळम, तामिळ, कन्नड आणि हिंदी भाषेत एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.