Pete Davidson, Kim Kardashian : अमेरिकन सुपरस्टार किम कर्दाशियन (Kim Kardashian) अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्टसोबतच्या घटस्फोटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेली किम आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कान्ये वेस्टसोबतचे (Kanye West) नाते तोडल्यापासून ती कॉमेडियन आणि अभिनेता पीट डेव्हिडसनसोबतच्या (Pete Davidson) तिच्या नात्याबद्दल चर्चेत होती. दरम्यान, आता अभिनेत्रीने पीट डेव्हिडसनसोबतचे नातेही तोडल्याची बातमी समोर येत आहे.
कान्ये वेस्टपासून विभक्त झाल्यानंतर, किम कॉमेडियन आणि अभिनेता पीट डेव्हिडसनला डेट करत होती. परंतु, मीडिया रिपोर्टनुसार आता त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. पीट आणि किम दोघेही जवळपास गेल्या 9 महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. मीडिया रिपोर्टनुसार, सुपरस्टार किम आणि पीट याच आठवड्यात वेगळे झाले आहेत. मात्र, याबाबत दोघांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
अशी झाली प्रेमकहाणी सुरु...
किम आणि पीटचे रिलेशनशिप गेल्या वर्षी म्हणजेच ऑक्टोबर 2021मध्ये सुरू झाले होते. दोघेही एकमेकांना खूप पसंत करत होते. किम 'SLN' हा शो होस्ट करत होती, तर पीट या कॉमेडी स्केच शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसला होता. त्याच वेळी, किम आणि रॅपर कान्ये वेस्ट यांच्या घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात सुरू होते. कान्येपासून वेगळे झाल्यानंतर तिला पीट डेव्हिडसनसोबत अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट केले गेले आहे. या नात्यात ते खूप खूश असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले होते.
तीन लग्न, चार मुलं आणि घटस्फोट
अभिनेत्री-मॉडेल किम कार्दशियनने आतापर्यंत तीन वेळा लग्न केले आहे. अभिनेत्रीने 2000मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी डॅमन थॉमसशी पहिले लग्न केले होते. मात्र, लग्नाच्या चार वर्षांनी म्हणजे 2004मध्ये दोघेही वेगळे झाले. यानंतर, 2011मध्ये, तिने ख्रिस हमपेरिसशी लग्न केले. परंतु, हे लग्न देखील दोन वर्षांत म्हणजे 2013मध्ये तुटले. यानंतर किमने 2014मध्ये इटलीतील कान्ये वेस्टशी लग्न केले. या लग्नातून त्यांना चार मुलेही झाली. मात्र, 2020मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला, त्यानंतरही त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली.
हेही वाचा :
Met Gala 2021: किम कार्दशियनचा ब्लॅक अवतार, डोक्यापासून पायापर्यंत एकच रंग; फोटो व्हायरल