Kili Paul : इंस्टाग्रामवर रोज नवनवीन काहीतरी पाहायला नेटकऱ्यांना आवडत असते. रील्स पाहण्यात बरेच तास नेटकरी सोशल मीडियावर (SOCIAL MEDIA ) घालवतात. त्यापैकी इन्स्टाग्रामवर व्हायरल होणारी जोडी म्हणजे टांझानियाचे (Tanzania)  किली पॉल (KILI PAUL ) आणि नीमा पॉल. बॉलिवूड गाण्यांवर रील्स करणाऱ्या या जोडीने आता भारतीय वेशभूषेत एक नवे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. दिल बोले वाह वाह आणि शाहरूख- ऐश्वर्याच्या जोशमधील हाये मेरा दिल... या गाण्यावरील त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. 


प्रत्येक वेळी काहीतरी नवखे करणारा हा किली पॉल कायमच नेटकऱ्यांचे मनोरंजन करत आला आहे. त्यामुळे भारतात त्याचे चांगले फॅन फॉलोविंग आहे.  नुकत्याच टाकलेल्या  व्हिडीओमध्ये  किली पॉल आणि नीमा पॉल "दिल बोले वाह वाह" या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी भारतीय वेशभूषेत हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांचा हा हटके परफॉर्मन्स आणि लूक पाहून लोकांना अगदी त्यांच्यावर प्रेम झाले आहे. तसेच या व्हिडीओला अनेक नेटकरी जास्तीत जास्त शेअर करत आहेत. ज्यामुळे लाखो यूजर्सचे लक्ष वेधले गेले आहे. 



तर दुसऱ्या एका व्हिडीओत या जोडीने जोश चित्रपटातील शाहरुख आणि ऐश्वर्याचा अंदाज शेअर केला आहे. या व्हिडीओवर भारतीय चाहते चांगलेच खूश झाले असून त्यांनी त्यावर अनेक मजेदार कमेंट्सही केल्याचं दिसून येतंय. 


 






Kili Paul and Neema Paul Viral Video : इंडियन आऊटफिट मध्ये केला हटके डान्स 


किली पॉलने त्याच्या ऑफिशिअल  इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये फिकट नारंगी रंगाचा कुर्ता घातलेला आहेत तर त्याची बहीण नीमा हिने जांभळ्या रंगाचा लेहंगा चोली घातलेला दिसत आहे. पहिल्यांदाच भारतीय वेशात थिरकणारे हे दोघे जोमात व्हायरल होताना दिसत आहेत.  


व्हिडीओला मिळाले तब्बल 90 लाखाहून जास्त व्ह्यूज 


व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सुरुवातीला किली पॉल लीप सिंक करताना दिसत आहे. तेवढ्यात नीमा पॉलची एन्ट्री होताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत किली पॉलने कॅपशन दिले आहे , "नीमा कि एन्ट्री क्या बात". पाच दिवसांपूर्वी पोस्ट केलेला या व्हिडीओला जवळपास 90 लाखाहून जास्त व्ह्यूज मिळाले असून पाच लाख लोकांनी त्याला लाईक केले आहे. तसेच व्हिडीओला दाद देत अनेक नेटकऱ्यांनी कंमेंट्टचा वर्षाव केला आहे. 


ही बातमी वाचा :