Amitabh Bachchan:  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतात. अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. नुकताच अमिताभ बच्चन यांनी एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दिसत आहे. त्या व्यक्तीच्या हेअर स्टाईलनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


अमिताभ बच्चन यांनी एका व्यक्तीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याचे केस अशा पद्धतीनं फिरवतं आहे, जे पाहून वाटते की त्यानं डोक्यावर पंखा लावला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन अमिताभ बच्चन यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'भर उन्हात तो स्वत:चा पंखा घेऊन फिरत आहे.'


नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स


बिग बींनी शेअर केलेल्या या मजेशीर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली,  'अमिताभ बच्चन सर, हा उन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी केलेला गॉड गिफ्टेड जुगाड आहे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली,  'तो अलादीनचा जिन आहे, तो काहीही करू शकतो.' अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


पाहा व्हिडीओ: 






अमिताभ बच्चन यांचे आगामी चित्रपट


अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  सध्या बिग बी नाग अश्विन यांच्या 'प्रोजेक्ट के' (Project K) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. 'प्रोजेक्ट के' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच प्रभास आणि दीपिका पादुकोण हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत.  तसेच त्यांनी  रिभू दासगुप्ता लिखित आणि दिग्दर्शित 'सेक्शन 84' हा चित्रपट देखील साइन केला आहे, असंही म्हटलं जात आहे. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत असते. 


अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळेल का? या प्रश्नाचे उत्तर लवकरच त्यांच्या चाहत्यांना मिळेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Amitabh Bachchan: बिग बींची बाईक राईड; अनोळखी व्यक्तीचा फोटो शेअर करत म्हणले, 'धन्यवाद मित्रा...'