Kiccha Sudeep : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीपचा (Kiccha Sudeep) विक्रांत रोणा (Vikrant Rona) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर जूनमध्ये रिलीज झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सध्या किच्चा सुदीप हा त्याच्या या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. किच्चा हा हिंदी भाषेवरील वक्तव्यामुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत होता. आता एका मुलाखतीमध्ये त्यानं बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांबद्दल त्याची मतं व्यक्त केली.
एका मुलाखतीमध्ये साऊथ चित्रपटांच्या यशाबद्दल किच्चा सुदीप म्हणाला, 'जेव्हा कंटेन्ट चांगला असतो. तेव्हा तो सर्व ठिकाणी पोहचतो. लोकांना हे चित्रपट पाहण्यासाठी जबरदस्ती केली नाही. हे ऑरगॅनिकली झालं आहे. हा कंटेन्टचा विजय आहे.' पुढे तो म्हणाला, 'आपण आधी हम दिल दे चुके सनम, मैने प्यार किया, शोले, हम साथ साथ हैं आणि कभी खुशी कभी गम पाहत होतो. गुजराती आणि पंजाबी कुटुंबांच्या कथा आपण बंगळुरूच्या सिनेमागृहात पाहिल्या आहेत. जर प्रेक्षकांच्या आवडीचा कंटेन्ट त्यांना दिला तर ते आवडीनं बघतील.'
सुदीप आणि सलमानचे जुने नाते!
सुदीपने सलमानच्या 'दबंग 2'मध्ये खलनायकी भूमिका साकारली होती. त्याने म्हटले की, विक्रांत रोणाचे शूटिंग सुरुवात केले, तेव्हा त्याने सलमानशी अधिक चर्चा केली नाही. किच्चा सुदीपने असेही म्हटले की, सलमान नेहमीच त्याच्या चित्रपटांमध्ये कॅमिओ किंवा गाणे करण्यास तयार असतो. परंतु, जर त्याला त्या प्रोजेक्टवर विश्वास नसेल, तर तो त्याच्या निर्मिती कंपनीला कोणत्याही प्रकल्पाशी जोडत नाही.
किच्या सुदीपच्या विक्रांत रोणा हा चित्रपट इंग्रजी, कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 28 जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनूप भंडारी लिखित आणि दिग्दर्शित, 'विक्रांत रोना' थ्रीडीमध्ये प्रदर्शित होणार आहे. विक्रांत रोणा चित्रपटाच्या ट्रेलरला अनेकांची पसंती मिळाली.
हेही वाचा: