Vikrant Rona Trailer Out : साऊथ स्टार किच्चा सुदीपचा (Kiccha Sudeep) बहुप्रतीक्षित चित्रपट 'विक्रांत रोणा' (Vikrant Rona) 28 जुलै रोजी रिलीज होणार आहे. सुदीप त्याच्या चित्रपटामुळे आधीच चर्चेत आला आहे. त्याच्या चित्रपटाचे पोस्टरच खूपच जबरदस्त होते. या पोस्टर रिलीजपासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता वादळी होती. नुकताच या चित्रपटाचा हिंदीतील ट्रेलर रिलीज झाला आहे. बॉलिवूड स्टार सलमान खानने या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर शेअर केला आहे. एका कार्यक्रमात सुदीपने ‘भाईजान’ सलमान खानबद्दल बरेच कौतुक केले होते. यानंतर आता सलमान खानने त्याच्या इंस्टावर चित्रपटाचा हिंदी ट्रेलर आणि पोस्टर रिलीज करत सुदीपचे खूप कौतुक केले आहे.


सलमान खानने पोस्टरचा फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना लिहिले की, 'भाऊ @kichchasudeep तुझ्या विक्रांत रोणाचा जगाला अभिमान वाटेल. अतिशय उत्कृष्ट.’ पोस्टरमधील सुदीपचा लूक पाहण्यासारखा आहे. साहजिकच त्याचा चित्रपटही हिट होणार आहे. सलमान खानने हा ट्रेलर हिंदीमध्ये, धनुषने तामिळमध्ये, दुल्कर सलमानने मल्याळममध्ये, रामचरणने तेलुगूमध्ये आणि कन्नडमध्ये किच्चा सुदीपने स्वतः लाँच केला आहे.



सुदीप आणि सलमानचे जुने नाते!


सुदीपने सलमानच्या 'दबंग 2'मध्ये खलनायकी भूमिका साकारली होती. त्याने म्हटले की, विक्रांत रोणाचे शूटिंग सुरुवात केले, तेव्हा त्याने सलमानशी अधिक चर्चा केली नाही. किच्चा सुदीपने असेही म्हटले की, सलमान नेहमीच त्याच्या चित्रपटांमध्ये कॅमिओ किंवा गाणे करण्यास तयार असतो. परंतु, जर त्याला त्या प्रोजेक्टवर विश्वास नसेल, तर तो त्याच्या निर्मिती कंपनीला कोणत्याही प्रकल्पाशी जोडत नाही.


या भाषांमध्ये प्रदर्शित होणार 'विक्रांत रोणा'


अनूप भंडारी लिखित आणि दिग्दर्शित, 'विक्रांत रोना' थ्रीडीमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात निरुप भंडारी, नीता अशोक, रविशंकर गौडा, मधुसूदन राव आणि वासुकी वैभव यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट इंग्रजी, कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमध्ये दाखवलेल्या किच्चा सुदीपच्या ग्रँड एंट्रीपासून ते त्यातील अप्रतिम व्हिज्युअल इफेक्ट्सपर्यंत सर्वच गोष्टी प्रेक्षकांना आवडत आहेत. ग्लॅमरस अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनेही तिच्या हॉट अवताराने ट्रेलरमध्ये धुमाकूळ घातला आहे.


हेही वाचा :


Entertainment News Live Updates 24 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!


Biopics On Cricketers : एम. एस धोनी ते चकदा एक्सप्रेस; क्रिकेटर्सचं आयुष्य रुपेरी पडद्यावर उलगडणारे चित्रपट


Thipkyanchi Rangoli : ठिपक्यांची रांगोळी मालिकेत नवा ट्विस्ट; अभिनेत्री वीणा जगतापची होणार एन्ट्री