Sonu Sood : भोंगा आणि हनुमान चालिसा वाद सध्या देशभरात चर्चेत आहे. यावर अनेक नेते सध्या या विषयावर त्यांची मतं मांडत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेदेखील (Sonu Sood) प्रतिक्रिया दिली आहे. देशात सुरू असलेल्या या वादामुळे सोनू सूदला प्रचंड दु:ख होत आहे. 


पुण्यात पार पडलेल्या JITO कनेक्ट 2022 समिट दरम्यान सोनू सूदने भोंगा आणि हनुमान चालीसा वादावर भाष्य केलं आहे. दरम्यान त्याने लोकांना एकत्र येण्याचं आवाहनदेखील केलं. सोनू सूद नेहमीच देशात सुरू असलेल्या अनेक समस्यांवर भाष्य करत असतो. लोकांना आता धर्म आणि जातीचं बंधन तोडायला हवं, असंदेखील सोनू सूद म्हणाला. 


भोंगा आणि हनुमान चालीसा वादावर सोनू सूद म्हणाला, "कोरोना काळात लोकांनी धर्म बाजूला ठेवला आणि एकमेकांना मदत केली. समाजात फक्त माणुसकी आणि बंधुता पाहायला मिळावी, असं वाटत असेल तर भोंगा आणि हनुमान चालीसा वाद संपायला हवा".





अनेक लोक  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सोनू सूदकडे मदत मागतात. 'फतेह' आणि 'पृथ्वीराज' हे सोनू सूदचे आगामी सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शहीद' या सिनेमाच्या माध्यमातून सोनूनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.


संबंधित बातम्या


Sonu Sood : शेजारी राहणाऱ्या मुलाच्या शिक्षणासाठी नेटकऱ्यानं मागितला मदतीचा हात; सोनू म्हणाला, 'आत वेळ आली आहे...'


Anek :  हिंदी भाषेच्या वादानंतर आता आयुष्मानच्या 'अनेक' चित्रपटामधील सीन व्हायरल; नेटकऱ्यांकडून कौतुक


Kajal Aggarwal : मातृदिनी सिंघम गर्ल काजल अग्रवालने शेअर केली मुलाची पहिली झलक, पोस्ट चर्चेत