Ketki Dave : प्रसिद्ध अभिनेत्री केतकी दवे (Ketki Dave) या त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’या मालिकेमुळे आणि ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपया’ या चित्रपटामुळे केतकी दवे यांना विशेष लोकप्रियता मिळाली. केतकी यांच्या पतीचे म्हणजेच रसिक दवे (Rasik Dave) यांचे 28 जुलै रोजी निधन झालं. पतीच्या निधनानंतर दोन दिवसांनी केतकी यांनी शूटिंगला सुरुवात केली. एका मुलाखतीमध्ये  केतकी यांनी याबाबत सांगितलं. 


केतकी दवे म्हणाल्या की, 'सेटवर मी केतकी नाही तर एक अभिनेत्री असते. मला असं वाटतं नाही लोकांनी माझ्या दु:खात सामील व्हावं. जेव्हा मी अस्वस्थ होते. तेव्हा देखील मी काम केलं आहे. एका प्रोजेक्टमध्ये फक्त मी नाही तर पूर्ण टीम सामील असते. शो आधीपासूनच बुक केलेले असतात. मला असं वाटत की माझ्यामुळे कोणता प्रॉब्लेम होऊ नये.'
 
निधनाच्या आधी रसिक हे केतकी यांना काय म्हणाले? 
निधनाच्या आधी रसिक यांनी केतकी यांना सांगितलं होतं की, त्यांनी काम सोडू नये. केतकी यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट करत राहावे, अशी रसिक यांची इच्छा होती. 


केतकी आणि रसिक यांना रिद्धी आणि अभिषेक ही दोन मुलं आहेत. रसिक दवे यांच्या निधनानं मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन रसिक यांना श्रद्धांजली वाहली. रसिक यांनी  गुजराती भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी 1982 मध्ये रिलीज झालेल्या 'पुत्र वधू' या गुजराती चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. रसिक हे हिंदी आणि गुजराती अशा दोन्ही भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करत होते.  केतकी आणि रसिक यांनी  2006 मध्ये 'नच बलिए' या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. या कार्यक्रमामधील या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.


 वाचा सविस्तर बातमी: 


Rasik Dave: अभिनेते रसिक दवे यांचे निधन; वयाच्या 65 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास