Kavya Maran Wedding : सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाची मालकीण काव्या मारन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. (Kavya Maran Wedding) काव्याने आपला जोडीदार निवडला असून ती दक्षिणेतील प्रसिद्ध गायक अनिरुद्ध रविचंद्रनसोबत विवाह करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काव्या आणि अनिरुद्ध गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहेत. (Kavya Maran Wedding)

Continues below advertisement

कोण आहे जास्त श्रीमंत?

काव्या मारन ही सन ग्रुपचे प्रमुख कलानिधी मारन यांची मुलगी आहेत. ती आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद या फ्रेंचायझीच्या CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) म्हणून काम पाहाते. SRH च्या सर्व सामन्यांमध्ये काव्या मारन नेहमी स्टेडियममध्ये उपस्थित राहून आपल्या संघाला सपोर्ट करताना पाहायला मिळते. काव्या IPL मधून मोठ्या प्रमाणात कमाई करते. अहवालानुसार, काव्याची एकूण संपत्ती सुमारे 400 कोटी रुपये आहे.

काव्या मारनचं ज्याच्यासोबत लग्न जमलंय तो अनिरुद्ध रविचंद्रन देखील श्रीमंत आहे. त्याच्या संपत्तीची किंमत अंदाजे 50 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

Continues below advertisement

IPL 2025 मध्ये SRH साठी निराशाजनक कामगिरी

दरम्यान, SRH च्या सामन्यांदरम्यान काव्या मारन आनंदाने जल्लोष करताना पाहायला मिळते, मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर आनंदापेक्षा निराशाच अधिक दिसून आली. SRH साठी आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम फारसा विशेष ठरला नाही. लीग स्टेजमध्ये SRH सहाव्या क्रमांकावर राहिली आणि प्लेऑफसाठी पात्र ठरू शकली नाही.

सनरायझर्स हैदराबादने एकूण 14 सामने खेळले, त्यापैकी केवळ 6 सामने जिंकले, तर 7 सामने गमावले. एक सामना बरोबरीत राहिला. एकूण 13 गुणांसह SRH सहाव्या स्थानावर होती. या हंगामात SRH बराच काळ नवव्या क्रमांकावर होती, पण अखेरच्या तीन सामन्यांमध्ये विजय मिळवून त्यांनी हंगामाचा थोडाफार चांगला शेवट केला.

काव्या मारन ही चेन्नईमधील एका मोठ्या उद्योगपती कुटुंबातील आहे. तिचे वडील कलानिधि मारन हे सन ग्रुपचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. काव्याचा जन्म 6 ऑगस्ट 1992 रोजी चेन्नई येथे झाला होता. चेन्नईतील शाळेतून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर त्यांनी चेन्नईतील स्टेला मारिस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व कॉमर्समध्ये पदवी मिळवली. त्यानंतर काव्या पुढील शिक्षणासाठी ब्रिटनला गेल्या. तिथे त्यांनी लियोनार्ड एन. स्टर्न स्कूल ऑफ बिझनेस येथून एमबीएची पदवी घेतली.

आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर काव्या मारन भारतात परत आली आणि आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात, म्हणजेच सन टीव्ही नेटवर्कमध्ये जबाबदारी सांभाळण्यास सुरुवात केली. 2019 मध्ये त्यांना सन टीव्ही नेटवर्कच्या डायरेक्टर्स पॅनलमध्ये सामील करण्यात आले. त्यांच्या हाती सन नेटवर्कच्या सन म्युझिक आणि एफएम चॅनेल्सची जबाबदारी आहे. काव्या मारन यांना क्रिकेटमध्ये खूप इंटरेस्ट आहे. आयपीएलमधील खेळाडूंच्या लिलावात ज्या प्रकारे त्या उत्साहाने बोली लावताना दिसतात, त्यावरून हे स्पष्ट होते की संघासाठी खेळाडूंची निवड करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

करिश्मा कपूरचा घटस्फोटीत पती होता अमेरिकन? कागदपत्रांमुळे पार्थिव भारतात आणण्यास होणार उशीर?