मुंबई : नांदेडकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जालना ते मुंबई रेल्वेने प्रवास करणारी वंदे भारत एक्स्प्रेस आता नांदेडहून धावणार असल्याची माहिती पुढे आली आहे. सोबतच ही गाडी आता नांदेड-मुंबई एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणार असून या गाडीला परभणी रेल्वे स्थानकातही थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाश्यांना ही रेल्वेसेवा सोयीची ठरणार आहे. साहजिकजच या नव्या निर्णयामुळे गाडीच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. ही गाडी छत्रपती संभाजीनगरहून सकाळी सव्वाआठ वाजता मुंबईच्या दिशेने निघेल.

Continues below advertisement

दरम्यान, याचं मुद्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी छत्रपती संभाजीनगर-वंदे भारत रेल्वे नांदेडपर्यंत पुढे नेली  असाच प्रयोग जनशताब्दी बाबत करावा. परिणामी संभाजीनगरच्या प्रवाश्यांसाठीचा तिकीट कोटा खूप कमी झाला आहे. गाड्यांमध्ये गर्दी, असुरक्षित प्रवास वाढला तो वेगळा. उलट नांदेड-मुंबई अशी स्वतंत्र वंदे भारत सुरू करून देणे सर्वांच्याच हिताचे ठरेल. अशी मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्याकडे केली आहे. त्यांनी आपल्या एक्स या समाज माध्यमावर पोस्ट शेयर करत ही मागणी केली आहे. 

महाराष्ट्रातील 'या' 2 जिल्ह्यांनाही जोडणार वंदे भारत!

स्थानकात येण्याची वेळ/ स्थानकातून सुटण्याची वेळ

परभणी - पहाटे 5.40 वाजता/ पहाटे 5. 42 वाजताजालना - सकाळी 7.20 वाजता / सकाळी 7.22  वाजताछत्रपती संभाजीनगर- सकाळी ८.१३ वाजता / पहाटे ८.१५ वाजताअंकाई - सकाळी ९.४० वाजतामनमाड - सकाळी ९.५८ वाजता / सकाळी १०.०३ वाजतानाशिक रोड - सकाळी ११ वाजता / सकाळी ११.०२ वाजताकल्याण -दुपारी १ वाजून २० मिनिटे/ दुपारी १.२२ वाजताठाणे - दुपारी १.४०वाजता/ दुपारी १.४२ वाजतादादर - दुपारी २.१० वाजता / दुपारी २.१० वाजताआणि सीएसएमटी येथे दुपारी दोन वाजून २५ मिनिटांनी पोचेल.

Continues below advertisement

स्थानकात येण्याची वेळ/ स्थानकातून सुटण्याची वेळ

दादर - दुपारी १.१७ वाजता / दुपारी १.१९ वाजताठाणे -दुपारी १.४० वाजता / दुपारी १.४२ वाजताकल्याण - दुपारी २.४ वाजता / दुपारी २.०६ वाजतानाशिक रोड - दुपारी ४.१८वाजता / दुपारी ४.२०मनमाड - सायंकाळी ५.१८ वाजता / सायंकाळी ५.२० वाजताअंकाई - सायंकाळी ५.५० वाजता / सायंकाळी ५.५२ वाजताछत्रपती संभाजीनगर - सायंकाळी ७.५ वाजता / सायंकाळी ७.१० वाजताजालना - रात्री ८.०५ वाजता / ५.०७ वाजतापरभणी - रात्री ९.४३ वाजता / रात्री ९.४५ वाजतानांदेड येथे रात्री दहा वाजून ५० मिनिटांनी पोहचेल. रेल्वेत आठ एसी सेकंड क्लास सीटर कोच उपलब्ध रहणार आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

मोठी बातमी: अंबादास दानवे थेट प्रकाश महाजनांच्या घरी, राणेंच्या धमकीनंतर विचारपूस; सेना-मनसे युतीसाठीही मशागत?