Kaun Banega Crorepati Next Host: बॉलिवूडचे (Bollywood Actor) बिग बी (Bigg B) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या अभिनयासोबतच आवाजासाठीही ओळखले जातात. अमिताभ बच्चन यांनी फक्त रुपेरी पडदाच गाजवला नाहीतर, टेलिव्हिजन इंडस्ट्रीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) म्हटलं की, अमिताभ बच्चन हे समीकरण जुळून आलं आहे. बिग बी 2000 सालापासून 'कौन बनेगा करोडपती'मार्फत प्रेक्षकांच्या मनाच्या हॉटसीटवर राज्य करत आहेत.  पण, आता मात्र बिग बी 'कौन बनेगा करोडपती'च्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकतात. जर असं झालं तर 'कौन बनेगा करोडपती'चं सिंहासन कोण सांभाळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Continues below advertisement

अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती'च्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर हॉट सीट कोण सांभाळणार? अशा चर्चा सध्या सुरू आहेत. सध्या बॉलिवूडमधील दोन मोठी नावं समोर येत आहेत. मनी कंट्रोलच्या मते, 82 वर्षीय अमिताभ बच्चन त्यांच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी 'कौन बनेगा करोडपती' सोडण्याचा विचार करत आहेत. 'केबीसी 15' दरम्यान बिग बींनी सोनी टीव्हीला तसं सांगितलंही होतं की, ते आता केबीसी सोडण्याचा विचार करत आहेत. पण योग्य होस्ट न मिळाल्यामुळे, बिग बी 'कौन बनेगा करोडपती'च्या 16 व्या सीझनचे होस्टिंग देखील करताना दिसत आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या जागी प्रेक्षकांना 'या' सुपरस्टारला पाहायचंय

'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर अमिताभ बच्चन होस्ट म्हणून आपल्या जबाबदारीतून मुक्त होणार आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँड्स (IIHB) आणि एका जाहिरात एजन्सीनं अलिकडेच 'कौन बनेगा करोडपती'च्या होस्टसंदर्भात एक सर्वेक्षण केलं. तब्बल 768 लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं, ज्यामध्ये 408 पुरुष आणि 360 महिलांचा समावेश होता. या काळात, 'केबीसी'चे पुढील होस्ट म्हणून शाहरुख खान हा सर्वोत्तम पर्याय मानला जात होता. शाहरुख खाननं याआधी एकदा हा रिअॅलिटी शो होस्ट केला आहे. 2007 मध्ये शाहरुख खाननं 'केबीसी सीझन 3' होस्ट केला होता.

Continues below advertisement

ऐश्वर्या रायलाही अनेकांची पसंती 

शाहरुख खाननंतर, या सर्वेक्षणात पुढचं नाव अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय हिचं होतं. क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनी तिसऱ्या क्रमांकावर होता. दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्यानंतर 'कौन बनेगा करोडपती' कोण होस्ट करेल, याबाबत कोणतंही अधिकृत नाव जाहीर झालेलं नाही.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

शाहरुख खानचा 'मन्नत' कायद्याच्या कचाट्यात? अख्खं कुटुंब सध्या राहतंय भाड्याच्या घरात, प्रकरण नेमकं काय?